एक ग्लासभर जिर्याचं पाणी प्यायल्यास दिवसभर पोटाच्या विकारापासून सुटका होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 07:24 PM2017-08-08T19:24:09+5:302017-08-08T19:30:47+5:30

सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास जिर्याचं पाणी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासरख्या त्रासातून मुक्तता तर होतेच शिवाय शरीराची सर्व कामं वेळेच्या वेळी उत्तम पार पडतात.

Drink one glass cummin water daily and get 9 benefits | एक ग्लासभर जिर्याचं पाणी प्यायल्यास दिवसभर पोटाच्या विकारापासून सुटका होते.

एक ग्लासभर जिर्याचं पाणी प्यायल्यास दिवसभर पोटाच्या विकारापासून सुटका होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे* जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो.* बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो.* शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं.



- माधुरी पेठकर.


अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासारखे पोटाचे विकार दिसायला छोटे दिसतात. पण दिवसाचे चोवीस तास बेजार करतात. दिवसभर या त्रासांनी त्रस्त राहण्याापेक्षा दिवसाच्या सुरूवातीलाच त्यावर उपाय केला तर?
याउपायासाठी स्वयंपाकघरातील जिरे मोठं काम करतात. त्यासाठी करायचं एकच. सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात थोडे जीरे घालून पाणी चांगलं उकळावं. पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करावा. पाणी गार होवू द्यावं. आणि रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं. एक ग्लासभरून जिर्याचं पाणी घेतल्यास अनेक फायदे होतात.

 



जिर्याचं पाणी प्यावं कारण..

1) जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो. अपचन, पित्त, पोटफुगी यापासून आराम मिळतो. जिर्याचं पाणी वेदनाशामक म्हणूनही काम करतं. पोटातल्या चमका, ओटीपोटातल्या वेदना या पाण्यामुळे बर्या  होतात.
2) गर्भावस्थेत जिर्याच्या पाण्याचा पचनासाठी मोठा उपयोग होतो.  कार्बोहायड्रेटस आणि फॅटसच्या पचनासाठी उपयुक्त विकरांना प्रोत्साहन देण्याचं काम जिर्याचं पाणी करतं आणि या अवस्थेत पचनाचे विकार होत नाही.
3) बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो. स्तनातील दूधग्रंथी या पाण्यामुळे कार्यरत होवून मातेच्या दूधाचं प्रमाण वाढतं.
4) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात जीरे मोठी भूमिका पार पाडतात. शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं. हे पाणी जर नियमित सेवन केलं तर आजारी पडण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.
5) सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जिर्याचं पाणी नियमितपणे प्यायल्यास त्याचा उपयोग रक्तातील साखर कमी करण्यास होतो.
6) श्वसविकारात जिर्याचं पाणी उपयुक्त ठरतं. श्वसननलिकेतले अडथळे हे पाणी काढून टाकतं. तसेच छातीत चिकट स्त्राव साठू देत नाही. त्याचा फायदा दम्याच्या रूग्णांना होतो.
7) जिर्यामध्ये पोटॅशिअम असतं. हे खनिज शरीराच्या क्रिया उत्तम पार पाडण्यात उपयोगी असतं. रक्तातील मीठाचे नकारात्मक परिणाम घालवून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम जिर्याचं पाणी करतं.
8) ज्यांना कोणाला दिवसभर मलूल वाटत असतं त्यांची ऊर्जा ही जिर्याच्या पाण्यानं वाढू शकते.
9) जिर्याचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं. जिर्याच्या पाण्यामुळे किडनीचं काम सुधारतं.

Web Title: Drink one glass cummin water daily and get 9 benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.