चवीने खाणाऱ्यांना प्रेमाने वाढायला अगदी सोप्या पद्धतीने तयार करा सोया पराठा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:05 PM2019-06-14T18:05:09+5:302019-06-14T18:06:29+5:30
पराठा जवळपास सर्व भारतीयांची पहिली पसंती आहे. नाश्त्यामध्ये पराठा, दही, लोणचं किंवा चहाची साथ असेल तर एकदम फक्कड बेतच असतो. पराठा खरं तर अनेक प्रकारे आणि अनेक पदार्थांचा वापर करून तयार करता येतो.
पराठा जवळपास सर्व भारतीयांची पहिली पसंती आहे. नाश्त्यामध्ये पराठा, दही, लोणचं किंवा चहाची साथ असेल तर एकदम फक्कड बेतच असतो. पराठा खरं तर अनेक प्रकारे आणि अनेक पदार्थांचा वापर करून तयार करता येतो. प्रत्येक पराठ्याची चव ही वेगवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला सोया पराठा तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा हेल्दी असण्यासोबतच तयार करण्यासाठी अगदी सोपा आहे. नाश्त्यासाठीच नाही तर तुम्ही हा पराठा तुम्हाला वाटेल तेव्हा तयार करून खाऊ शकता.
सोया पराठा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- गव्हाचं पिठ
- पाणी गरजेनुसार
- मीठ चवीनुसार
- रिफाइन्ड ऑइल
- क्रश केलेले सोया चंक्स
- कोथींबिर
- हिंग
- हिरवी मिरची
- बारिक कापलेला कांदा
- जीरे पावडर
- आलं
सोया पराठा तयार करण्याची कृती :
- सोया पराठा तयार करण्यासाठी सर्वात आधी सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा. थोड्या वेळाने सोया चंक्समधून पाणी काढून ते मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- आता एका बाउलमध्ये बारिक केलेले सोया चंक्स काढून घ्या. त्यामध्ये पिठ, रिफाइन्ड ऑइल आणि इतर मसाले एकत्र करून घ्या.
- पिठ व्यवस्थित मळून घ्या. आता हे 15 ते 20 मिनिटांसाठी एका बाजूला ठेवा. त्यानंतर पिठाचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्या.
- आता गॅसवर एक पॅन गरम करून घ्या. तयार पिठाचे गोळे लाटून पराठ्याचा आकार द्या. त्यावर तेल लावा आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या.
- चटणी किंवा सॉससोबत तयार पराठा सर्व्ह करा.