'या' शहरात आहे पाणीपुरीची वेंडींग मशीन, घ्या आवडत्या पाणीपुरीचा आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:26 PM2018-09-11T12:26:50+5:302018-09-11T12:29:04+5:30
पाणीपुरी न आवडणारा व्यक्ती क्वचितच कुठे सापडेल. देशाच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरीचा आनंद घेणारे लाक आढळतात. पाणीपुरीची लोकप्रियता पाहता एक नवीन तंत्रज्ञान यासाठी तयार करण्यात आलं आहे.
पाणीपुरी न आवडणारा व्यक्ती क्वचितच कुठे सापडेल. देशाच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरीचा आनंद घेणारे लाक आढळतात. पाणीपुरीची लोकप्रियता पाहता एक नवीन तंत्रज्ञान यासाठी तयार करण्यात आलं आहे. पाणीपुरी खाऊ घालण्याची एक वेंडींग मशीन लावण्यात आली आहे. या मशीनच्या मदतीने आणि तुमच्या आवडीची पाणीपुरी खाऊ शकता. चला जाणून घेऊ कुठे आहे पाणीपुरीची ही वेंडीग मशीन आणि याची खासियत...
कुठे आहे ही मशीन
गुजरातच्या अहमदाबाद शहरात देशातील पहिली पाणीपुरी वेंडीग मशीन लावण्यात आली आहे. या मशीनची खास बाब म्हणजे यात तुम्ही तुमच्या आवडीची पाणीपुरी खाऊ शकता. यासाठी वेंडींग मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप लावले आहेत. तुम्हाला ज्याप्रकारचं पाणी पाहिजे, जसे गोड, तिखट किंवा मिडियम हे एका बटनावर क्लिक करुन तुम्हाला मिळेल. बटन दाबल्यानंतर पाईपखाली पुरी धरा त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकलं जाईल. त्यामुळे आता जराही उशीर न लागता तुम्हाला पाणीपुरीचा आनंद घेता येऊ शकतो.
एकावेळी किती लोक खाऊ शकतात?
कोणत्याही स्टॉल किंवा दुकानावर पाणीपुरी खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. त्यामुळे नेहमीच आपला नंबर येण्याची वाट बघत बसावी लागते. पण या पाणीपुरी वेंडींग मशीनमुळे तुम्हाला जास्त वाट बघावी लागणार नाही. कारण या मशीनवर एकाचवेळी ६ ते ७ लोक एकत्र पाणीपुरी खाऊ शकतात. तुम्हाला केवळ पुरीमध्ये मसाला टाकावा लागेल आणि तुमच्या आवडीच्या पाण्यासोबत खावं लागेल.
किती येतो खर्च?
या वेंडींग मशीनमधून तुम्हाला पाणीपुरी खाण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाहीत. एखाद्या स्टॉलवर तुम्हाला जितका खर्च येतो तितकाच इथेही येतो. एक प्लेट पाणीपुरी खाण्यासाठी तुम्हाला केवळ २० रुपये खर्च येतो.
स्वच्छ भारताला सपोर्ट
या वेंडींग मशीनला स्वच्छ भारताच्या सहयोगासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यासाठी स्वच्छतेची खास सिस्टम तयार करण्यात आली आहे.