मधासोबत खा 'हे' ३ ड्राय फ्रूट, शरीराची कमजोरी होईल लगेच दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:35 PM2024-09-18T15:35:46+5:302024-09-18T15:45:08+5:30
Health Tips : आज आपण मधासोबत हे ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने काय फायदे मिळतात तेच जाणून घेणार आहोत.
Health Tips : शरीर निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी एक्सपर्ट्स नेहमीच वेगवेगळे ड्रायफ्रूट्स जसे की, बदाम, काजू, मनुके खाण्याचा सल्ला देत असतात. कारण यांमधील पोषक तत्वांनी शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. अशात जर तुम्ही मधासोबत काही ड्राय फ्रूट्स खाल तर त्यांची गुणवत्ता आणखी वाढते. आज आपण मधासोबत हे ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने काय फायदे मिळतात तेच जाणून घेणार आहोत.
काजू, बदाम आणि मनुके एकत्र खाण्याचे फायदे
- या तीन गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित राहते. तेच जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते कमी करण्यासही मदत मिळते.
- हे तिन्ही ड्राय फ्रूट्स एकत्र मधासोबत खाल्ल्याने तुमच्या मेंदुची कार्यक्षमताही वाढते. याने तुमची स्मरणशक्तीही वाढते. तसेच यांमुळे शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.
- त्याशिवाय या तिन्ही ड्राय फ्रूट्सच्या पोषक तत्वांमुळे तुमचे केस, नखे, त्वचा आणि हाडेही मजबूत होण्यास मदत मिळते.
बदामातील पोषक तत्व
बदामामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, रायबोफ्लोविन आयर्न, पोटॅशिअम, झिंक आणि व्हिटॅमिन बी भरपूर असतं.
काजू चे पोषक तत्व
काजूमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि काही आवश्यक मिनरल्स जसे की, कॉपर, मॅग्नेशिअम, झिंक, आयर्नसोबतच व्हिटॅमिन के, ई आणि बी सुद्धा भरपूर असतं.
मनुक्याचे फायदे
मनुक्यांमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, पोटॅशिअम, कॉपर. व्हिटॅमिन बी ६ आणि मॅगनिझसारखे पोषक तत्व असतात.
मधाचे फायदे
मध हे पोषक तत्व, खनिज आणि व्हिटॅमिनचा भांडार असतं. यात मुख्यपणे फ्रक्टोज आढळतं. त्याशिवाय यात कार्बोहायड्रेट, रायबोफ्लेविन, नायसिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी आणि अमिनो एसिडही असतं.