पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाल, तर इन्फेक्शनपासून दूर रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 03:52 PM2019-07-18T15:52:35+5:302019-07-18T15:54:03+5:30
पाऊस सुरू झाला की, आपल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा असते की, खिडकी किंवा बालकनीमध्ये बसून वाफलणाऱ्या चहाचा कप हातात आणि सोबतील काही आवडत्या गाण्यांची मैफिल असावी.
पाऊस सुरू झाला की, आपल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा असते की, खिडकी किंवा बालकनीमध्ये बसून वाफलणाऱ्या चहाचा कप हातात आणि सोबतील काही आवडत्या गाण्यांची मैफिल असावी. किंवा मग चहाच्या जोडीला गरमा-गरम भजी, कचोरी आणि स्नॅक्स खावं. एकदम स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणारे लोकही स्वतःला तळलेले पदार्थ खाण्यापासून रोखू शकत नाहीत. पण हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात. जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये स्वतःला हेल्दी ठेवायचं असेल. तसेच पावसाळ्यातील अनेक इन्फेक्शनपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही पदार्थांबाबत सांगणार आहोत. पावसाळ्यामध्ये या पदार्थांचं सेवन करणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं...
1. मक्याचं कणीस म्हणजेच, भुट्टा कदाचितच कोणाला आवडत नाही. जसं पावसाळा आणि चहा हे न तुटणारं समीकरण, त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये मका खाण्याची गमंत काही औरच... खास गोष्टी म्हणजे, मका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
2. पावसाळ्यामध्ये काळ्या मिरीचं सेवन केल्याने इन्फेक्शन आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. कोणतीही भाजी किंवा सलाडमध्ये काळी मिरी पावडर वापरल्याने पदार्थाची चव वाढण्यासोबतच आरोग्य राखण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त तुम्ही ताक आणि दहीदेखील खाऊ शकता.
3. पावसाळ्यात कडुलिंब, हळद, मेथी आणि कारलं यांचं सेवन करा. या पदार्थांच्या सेवनाने इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
4. मान्सूनमध्ये कच्च्या भाज्या आणि सलाड खाणं शक्यतो टाळा. याऐवजी उकडलेलं सलाडचं सेवन करा. कारण कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस मोठ्या प्रमाणात असतात. जे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनसाठी कारण ठरतात.
5. पावसाळ्यात सांधेदुखीने ग्रस्त असणाऱ्या लोकांनी सकाळी रिकाम्यापोटी तुळस आणि दालचिनीसोबत गरम पाणी पिणं आवश्यक असतं.यामुळे त्यांचा त्रास कमी होतो.
पावसाळ्यात या फळांचं सेवन करणंही ठरतं फायदेशीर :
पावसाळ्यामध्ये फळं खाणं शक्यतो आपण टाळतो. परंतु जेव्हा गोष्ट आरोग्याची असते, त्यावेळी इच्छा नसतानाही काही गोष्टी करणं फायदेशीर ठरतं. तसं पाहायला गेलं तर मान्सूनमध्ये लिची, जांभूळ आणि डाळिंब खाणं फायदेशीर ठरतं.
लिची
लिचीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आढळून येतं. याव्यतिरिक्त पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअण, फॉस्फरस आणि आयर्न यांसारखी पोषक तत्वही आढळून येतात. जे मान्सूमध्ये उद्भवणाऱ्या शरीराच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
जांभूळ
पोटाच्या सर्व समस्यांसाठी जांभूळ एक रामबाण उपाय आहे. हे पचनक्रिया उत्तम ठेवतं, तसेच बद्धकोष्टासारख्या समस्याही दूर करतं. मान्सूनमध्ये जास्तीत जास्त आजार हे पोटासंबंधातील असतात. अशातच जांभूळ फार फायदेशीर ठरतं.
डाळिंब
डाळिंबामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन के आढळून येतं. यामध्ये अस्तित्वात असणारे अॅन्टिऑक्सिडंट मान्सूनमध्ये होणाऱ्या त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.
पावसाळ्यामध्ये असा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर
पावसाळ्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये ब्लॅक टीसोबतच पोहे, उपमा, इडली यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ खाण्याऐवजी डाळ आणि भाजीसोबत सलाड आणि चपातीचा समावेश करा. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये भाजी, चपाती, दही आणि सलाड यांचा समावेश करा. या वातावरणात गरम गरम सूप पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये दररोज हळद एकत्र करून प्यायल्याने पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या दूर राहण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.