सकाळी रिकाम्यापोटी मनुके खा; आरोग्यासाठी होतात अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:25 PM2019-03-26T19:25:20+5:302019-03-26T19:26:31+5:30
ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट होणारे मनुके आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. आपण अनेकदा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलाव तयार करताना त्यामध्ये मनुक्यांचा वापर करतो. पण हे मनुके तुम्ही कधी अनोशापोटी खाल्ले आहेत का?
ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट होणारे मनुके आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. आपण अनेकदा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलाव तयार करताना त्यामध्ये मनुक्यांचा वापर करतो. पण हे मनुके तुम्ही कधी अनोशापोटी खाल्ले आहेत का? मनुक्यांमध्ये हेल्दी गुणधर्म असतात. यामध्ये आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराच्या विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी 5 ते 10 मनुके खाल्यानंतर पाणी प्या. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. जाणून घेऊया रिकाम्यापोटी मनुके खाण्याचे फायदे...
- अनोशापोटी मनुके खाल्याने यामध्ये असणारे अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासोबतच घशाचं इन्फेक्शन दूर करण्यासाठीही मदत करतो.
- पोटाच्या समस्या, बद्धकोष्ट यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर रात्री 8 ते 10 मनुके एका ग्लासामध्ये भिजत ठेवा. सकाळी अनोशापोटी हे पाणी मनुक्यांसोबत पिऊन टाका. यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही मदत होते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मनुके फायदेशीर ठरतात. कारण यांमध्ये ती सर्व पोषक तत्व असतात, जी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
- हाडांना मजबूत करण्यासाठी मनुके सकाळी अनोशापोटी मनुके खाणं उत्तम ठरतं. यामध्ये फायबरसोबत कॅल्शिअम आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीराची हाडांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
- रिकाम्यापोटी मनुके खाल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच लिव्हर, हार्ट आणि पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये असणारे गुणधर्म पोटातील अॅसिड कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं, जे शरीरामधील रक्त वाढविण्यासाठी मदत करतं.
- रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने नियमितपणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत मिळते.
- मनुक्याच्या पाण्यामध्ये अॅन्टिऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि बीटा केरोटिन यांसारखी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जी डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत करतात.