नेहमी एकाच प्रकारचे पदार्थ खाता का?; वेळीच सवय बदला अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 01:32 PM2019-09-28T13:32:18+5:302019-09-28T13:33:19+5:30
तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट खाता का? किंवा संध्याकाळी दलिया खाता का? जर तुम्ही असं करत असाल तर त्वरित तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणं आवश्यक आहे.
तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट खाता का? किंवा संध्याकाळी दलिया खाता का? जर तुम्ही असं करत असाल तर त्वरित तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणं आवश्यक आहे. तसं अनेक लोकांना वाटतं की, दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाणं फायदेशीर आहे. कारण त्या व्यक्ती नेहमी तेच पदार्थ खात असतात. परंतु, तुमची ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जाणून घेऊया अशी 5 कारणं ज्यांमुळे दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं.
पोषक तत्वांची कमतरता
आपल्या शरीराला अनेक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएट्ंसची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. ही गरज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्याने पूर्ण होते. पण जर तुम्ही एकाच प्रकारची फळं किंवा भाज्या खात असाल तर शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासते. आपल्या आहारात अनेक प्रकारची फळं आणि भाज्यांचा समावेश असणं गरजेचं असतं.
अन्ननलिकेवर होतो वाईट परिणाम
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक प्रकारचे पदार्थ खाल्याने अन्ननलिकेवरही परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्याने अन्ननिलिकेमध्ये चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरियाची ग्रोथ होते. त्यामुळे शरीराच्या रोगप्रितिकार शक्तीवर चांगला परिणाम होतो. जेवणामध्ये फर्मेंटेड फूड, फळं आणि भाज्या यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्याची प्रक्रियेमध्ये अडथळा
दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाल्याने वजन कमी करण्याची प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. एका रिसर्चमधून निष्पन्न झाल्यानुसार, ज्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या खातात. त्यावेळी त्यांचं वजन वेगाने कमी होतं.
एकाच प्रकारच्या पोषक तत्वांचं सेवन करणं टाळा
एखाच प्रकारचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने आपल्या शरीरामध्ये एकाच प्रकारच्या तत्वांचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालचं तर हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते परंतु, मोठ्या प्रमाणात खाल्याने लिव्हरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
(Image Credit : santecenter.co)
होऊ शकतो इटिंग डिसऑर्डर
एकाच प्रकारचे अन्नपदार्थ खाल्याने तुम्हाला सिलेक्टिव्ह इटिंग डिसऑर्डर होऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये व्यक्ती काही फूड कलर्स, टेक्शर आणि त्यांचा गंधामुळे डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. यामुळे शरीरातील पोषक तत्वांमध्ये कमतरता होते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)