आल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 11:29 AM2018-11-16T11:29:24+5:302018-11-16T11:29:47+5:30

थंडीच्या दिवसात आल्याचा चहा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. काही लोक तर या दिवसात वेगवेगळ्या भाज्यांमध्येही आल्याचा अधिक वापर करतात.

Excessive consumption of ginger is harmful | आल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या!

आल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या!

Next

थंडीच्या दिवसात आल्याचा चहा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. काही लोक तर या दिवसात वेगवेगळ्या भाज्यांमध्येही आल्याचा अधिक वापर करतात. कारण आल्याने या दिवसात वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव होतो. पण आल्याचं जास्त सेवन करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुम्ही हा विचार करत असाल की, आल्याच्या जास्त सेवनाने तुम्हाला जास्त फायदा होईल तर हा चुकीचा विचार आहे. जाणून घ्या अधिक प्रमाणात आलं सेवन करण्याचे नुकसान...

मॅरीलॅंड यूनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरनुसार, आल्याचं जास्त सेवन केल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त आल्याचं सेवन केल्यावर होणारे नुकसान सांगणार आहोत. याने तुम्ही वेळीच सावध व्हाल आणि होणाऱ्या समस्यांपासून बचाव करु शकाल. 

अॅसिडीटी - लोक सर्दी-पळसा, खोकला आणि पोटाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी आल्याचं सेवन करतात. पण मेरीलॅंड यूनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटर वेबसाइटनुसार, आल्याचं जास्त सेवन केल्यास तुम्हाला अॅसिडीटी, छातीत जळजळ होणे, पोटदुखी या समस्या होऊ शकतात. 

ब्लड क्लॉटिंग - ‘द 150 हेल्‍दीऐस्‍ट फूड्स ऑन अर्थ’ पुस्तकाचे लेखक डॉक्टर जॉनी बोडेन यांच्यानुसार, आल्याचं जास्त सेवन केल्याने तुमचं रक्त पातळ होऊ शकतं. त्यासोबतच रक्ताच्या होणाऱ्या गाठी अॅस्पिरिनसारख्याच रोखल्या जातात. अशात जर तुम्ही रक्त पातळ होऊ नये आणि रक्ताच्या गाठी होऊ नये म्हणून अॅस्पिरिन, वारफारिन किंवा हेपरिन सारखे औषधे घेत असाल तर तुम्हाला गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

गर्भावस्थेत त्रास - गर्भावस्थेत आल्याचं जास्त सेवन केल्याने मळमळ होणे किंवा उलटी होणे यापासून आराम मिळतो. पण एका शोधानुसार, आल्याचं जास्त सेवन केल्यास गर्भपाताचा धोकाही वाढतो. 

डायबिटीज - जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात, तर आल्याचं सेवन कमी प्रमाणातच करायला हवं. कारण आलं हळूहळू तुमच्या ब्लड शुगरला कमी करतं. याने तुम्हाला हायपोग्लायसीमिया म्हणजे रक्तात शुगरची कमतरता होण्याचा धोका होऊ शकतो. 

हृदयाला समस्या - आल्याचं जास्त सेवन करणे तुमचं काही प्रमाणात आरोग्य चांगलं ठेवतं, पण याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास समस्याही वाढतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, आल्याचं अधिक सेवन केल्यास हृदयाला योग्यप्रकारे काम करण्यास अडचण निर्माण होते. सोबतच ब्लड प्रेशर की होण्याची समस्याही डोकं वर काढू शकते. 
 

Web Title: Excessive consumption of ginger is harmful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.