तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे दारा सिंग थाळी, ३० मिनिटात संपवली तर द्यावे लागणार नाही पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 04:27 PM2019-06-05T16:27:28+5:302019-06-05T16:41:39+5:30

मुंबईतील नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॉनव्हेज चाहत्यांना एकाच थाळीमध्ये पोटभर नॉनव्हेज खायला मिळणार आहे.

Famous Dara Singh non-veg thali get in mini punjab lakeside Powai Mumbai | तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे दारा सिंग थाळी, ३० मिनिटात संपवली तर द्यावे लागणार नाही पैसे!

तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे दारा सिंग थाळी, ३० मिनिटात संपवली तर द्यावे लागणार नाही पैसे!

googlenewsNext

मुंबईतील नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॉनव्हेज चाहत्यांना एकाच थाळीमध्ये पोटभर नॉनव्हेज खायला मिळणार आहे. मुंबईच्या पवईमध्ये मिनी पंजाब लेकसाइड रेस्टॉरंटमध्ये एक तोंडाला पाणी सोडणारी अशी मसालेदार नॉनव्हेज थाळी तयार केली आहे.

या नॉनव्हेज थाळीला प्रसिद्ध भारतीय पेहलवान दारा सिंग यांच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे. या थाळीची खासियत म्हणजे यामध्ये १०-१२ नाही तर तब्बल ४४ प्रकारचे पदार्थ खायला मिळतील. थाळीमध्ये नॉनव्हेजमध्ये तुम्हाला सींक कबाब, मक्याची रोटी, मटन, बटर चिकन, पापड, सलाद, मटन मसाला, चिकन बिर्याणी, टंगडी कबाब, कोळी वाडा, चूर-चूर नान इत्यादी पदार्थ चाखायला मिळतील. 

त्यासोबतच थाळीमध्ये पंजाबची लोकप्रिय लस्सी, शिकंजी छास, ब्लॅक कॅरल पिण्यास मिळेल. स्वीट पदार्थांबाबत सांगायचं तर रसगुल्ला, जिलेबी, रबडी, मूगाचा शिरा, पेटा बर्फी, मालपुआ, आयस्क्रीमचा समावेश आहे. ही थाळी तयार करण्याची संकल्पना नवनीत चावला यांची आहे. त्यांनी सांगितले की, जर कुणी ही थाळी तीस मिनिटांच्या आत संपवली तर त्याला ही थाळी मोफत असेल.

रेस्टॉरंटचे सह-मालक जगजीत सिंह यांनी सांगितले की, आतार्यंत केवळ १२ लोकच ही थाळी पूर्णपणे संपवू शकले आहेत. ही थाळी सर्वात लवकर एका विदेशी नागरिकाने संपवली होती. त्यांनी ही थाळी ३० मिनिट २९ सेंकदात ही थाली संपवली होती.

Web Title: Famous Dara Singh non-veg thali get in mini punjab lakeside Powai Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.