उपवासही वाटेल हवाहवासा ! अशी करा साबुदाण्याची इडली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:43 PM2018-07-21T18:43:37+5:302018-07-21T18:49:58+5:30

ही इडली उपवासाला तर चालतेच पण चवीलाही भन्नाट लागते. 

Fasting special recipe of Sabudana Idli | उपवासही वाटेल हवाहवासा ! अशी करा साबुदाण्याची इडली 

उपवासही वाटेल हवाहवासा ! अशी करा साबुदाण्याची इडली 

googlenewsNext

पुणे : उपवास म्हटला की साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात किंवा फोडणीची भगर, बटाट्याची भाजी या पलीकडे आपण जात नाही. त्यामुळे काहीवेळा हा उपवास कंटाळवाणाही वाटतो. त्याकरीता आम्ही देत आहोत उपवासाच्या इडलीची पाककृती. ही इडली उपवासाला तर चालतेच पण चवीलाही भन्नाट लागते. 

साहित्य : 

२०० ग्रॅम साबुदाणा 

२०० ग्रॅम दही 

२५० ग्रॅम वरईचे तांदूळ 

बेकिंग सोडा 

चवीनुसार मीठ 

अर्धा चमचा जिरे 

कृती : साबुदाणा आणि वरईचे मिक्सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या. हे मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवावे. हे मिश्रण एक तास झाकून ठेवावे. इडलीपात्राला तूप किंवा तेल लावावे. गरजेनुसार पातेल्यात झाकलेले मिश्रण काढून त्यात पाव टी स्पून चमचा बेकिंग सोडा टाकून एकजीव करा. ते मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या. हलकी, चवदार इडली तयार. 

 

चटणी :ओला नारळाचा चव किंवा ते नसल्यास सुक्या खोबऱ्याचा किस, त्यात मिरची, मीठ, चवीपुरती साखर आणि अर्ध लिंबू पिळून मिक्सरमध्ये दाटसर होईल असे फिरवा. तुपात किंवा तेलात अर्धा चमचा जिरे टाकून ती फोडणी चटणीवर टाकून इडलीसोबत खायला घ्या. 

Web Title: Fasting special recipe of Sabudana Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.