डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात मेथीचे लाडू; असे करा तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:18 PM2019-01-04T13:18:37+5:302019-01-04T13:21:21+5:30
देशातील डायबिटीजच्या रूग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ, हे देशासमोरील सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण डायबिटीजने ग्रस्त आहेत.
देशातील डायबिटीजच्या रूग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ, हे देशासमोरील सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्याची कारणं जरी वेगळी असली तरिही डायबिटीजच्या रूग्णांमध्ये सतत होणारी वाढ चिंताजनक आहे. ज्या रूग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक असते. त्यांना सतत पॉलीयूरिया (सतत लघवीला होणं) यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना तहान (पॉलीडिप्सिया) आणि भूक (पॉलिफेजिया) जास्त लागते. जगभरातील लाखो लोकं आज हाय बीपी (High BP) आणि हायपरटेंशन (Hypertension) च्या समस्येचा सामना करत आहेत. अशावेळी इतर उपयांसोबतच तुम्हाला तुमच्या डाएटवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. आज जाणून घेऊया अशी एक रेसिपी जी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करेल.
फायदेशीर ठरतात मेथीचे लाडू :
आरोग्याशी संबंधित फायद्यांबाबत बोलायचे झाले तर, मेथी, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं, हृदयाशी निगडीत आजारांसोबतच डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले फायबर, अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया मेथीचे लाडू तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
मेथीचे लाडू तयार करण्याची रेसिपी :
साहित्य :
- 1/2 कप तूप
- 1 कप गव्हाचं पीठ
- 1 टेबल स्पून मेथी
- 2 टी स्पून बडिशेप
- एक छोटा चमचा सुंठाची पावडर
- ¾ कप गुळ किंवा साखर
कृती :
- एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पिठ टाकून मंद आचेवर भाजून घ्या.
- जवळपास अर्धा तास भाजल्यानंतर पिठ सोनेरी रंगाचं दिसू लागले. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या. जर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले नाही आणि तुम्ही यामध्ये साखर एकत्र केली तर मिश्रण कोरडं होईल.
- एका दुसऱ्या कढईमध्ये मेथी, बडिशेप टाकून भाजून नंतर मिक्सरमध्ये बारिक करा.
- जेव्हा पिठाचं मिश्रण पूर्णपणे थंड होईल त्यानंतर त्यामध्ये साखर आणि बारिक केलेलं मिश्रण एकत्र करा. आता सुंठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हाताने लाडू वळून घ्या.
- तुम्हा या मिश्रणामध्ये ड्राफ्रुट्सही वापरू शकता.
- एका एयर टाइट कंटेनरमध्ये लाडू व्यवस्थित बंद करून ठेवा.
- मेथीचे लाडू चार ते पाच आठवड्यांपर्यंत चांगले राहू शकतात.