किड्यांपासून तयार करण्यात येतो ब्रेड; तरीही आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:11 PM2019-01-24T13:11:44+5:302019-01-24T13:15:21+5:30
ब्रेडचा वापर आपण सर्रास नाश्त्यासाठी करत असतो. अनेकदा जंक फूडमध्ये सामावेश होणाऱ्या पदार्थांमध्येही ब्रेड वापरला जातो. मार्केटमध्ये व्हाइट ब्रेड, ब्राउन ब्रेड, ग्लूटन फ्री ब्रेड, होल व्हीट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड्स उपलब्ध असतात.
ब्रेडचा वापर आपण सर्रास नाश्त्यासाठी करत असतो. अनेकदा जंक फूडमध्ये सामावेश होणाऱ्या पदार्थांमध्येही ब्रेड वापरला जातो. मार्केटमध्ये व्हाइट ब्रेड, ब्राउन ब्रेड, ग्लूटन फ्री ब्रेड, होल व्हीट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड्स उपलब्ध असतात. पण तुम्ही या ब्रेड व्यतिरिक्त असा ब्रेड खाणं पसंत कराल का? जो फक्त किड्यांचा वापर करून तयार करण्यात आला आहे. ऐकून गोंधळलात ना? पण तुम्ही अगदी बरोबर ऐकलतं.
फिनलँडच्या एका कंपनीने 2017मध्ये ब्रेड तयार करण्यासाठी त्यामध्ये किड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल, परंतु या ब्रेडमध्ये 70 टक्के फक्त किडेच असतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ब्रेड तयार करण्यासाठी किड्यांचा वापर केल्यामुळे हा ब्रेड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये, कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगभरामध्ये जवळपास 2 अब्ज लोक किड्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या किड्यांचा वापर करतात. किड्यांचा वापर केल्याने हा ब्रेड इतर ब्रेडच्या तुलनेत स्वस्त असतो. किड्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या या ब्रेडला फिनलँड व्यतिरिक्त डेनमार्क, बेल्जिअम आणि नेदरलँड्स यांसारख्या देशांमधून मोठी मागणी आहे.
जगभरामध्ये हा ब्रेड तयार करणारी एकच अशी बेकरी आहे, जी ब्रेड तयार करण्यासाठी किड्यांचा वापर करते. किड्यांच्या रूपामध्ये क्रिकेट (Cricket insect) नावाच्या एका किटकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. सर्वात आधी या किटकापासून एक पावडर तयार करण्यात येते. त्यांनंतर ही पावडर पिठामध्ये एकत्र करून ब्रेड तयार करण्यात येतो. ज्या व्यक्ती या ब्रेडचा आहारामध्ये सामावेश करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की, हे खाण्यासाठी अत्यंत चविष्ट आहे. खाताना अजिबात समजतं नाही की हा ब्रेड तयार करण्यासाठी किड्यांचा वापर करण्यात आला आहे.
बेकरीच्या मालकांचं म्हणणं आहे की, पौष्टिक आहार सर्वांसाठी आवश्यक आहे. अशातच कमी पैशांमध्ये लोकांना पौष्टिक आहार मिळण्यास मदत होते. दुसरीकडे सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही लोकांना खरचं हा ब्रेड पौष्टिक असावा असं वाटत आहे. तर काही लोकांना हा प्रकार फार विचित्र वाटत आहे.