'प्लांट बेस्ड डाएट' म्हणजे नक्की आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 01:50 PM2018-11-10T13:50:57+5:302018-11-10T13:54:56+5:30
हल्ली लोकांमध्ये ऑर्गेनिक प्रोडक्ट्ससोबतच प्लांट बेस्ड डाएटचं फॅडही पहायला मिळतं. सध्याचं बदललेलं वातावरण आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सतत आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरं जावं लागतं.
(Image Creadi : napervillemagazine.com)
हल्ली लोकांमध्ये ऑर्गेनिक प्रोडक्ट्ससोबतच प्लांट बेस्ड डाएटचं फॅडही पहायला मिळतं. सध्याचं बदललेलं वातावरण आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सतत आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरं जावं लागतं. सततच्या या आरोग्याच्या तक्रारींपासून सुटका करून घेण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक लोक प्लांट बेस्ड डाएटचा आधार घेत आहेत. हे नाव ऐकून अनेक लोकांचा असा समज होतो की, यामध्ये फक्त शाकाहारी पदार्थांचाच समावेश करण्यात येतो. परंतु हा तुमचा गैरसमज आहे. यामध्ये काही अॅनिमल प्रोडक्ट्सचाही समावेश करण्यात येतो. जर तुम्ही हार्ट, लिव्हर, किडनीच्या समस्या, लठ्ठपणा, डायबेटिज, कॅन्सर यांसारख्या जीवघेण्या आजारांपासून स्वतःची सुटका करून घेऊ इच्छिता तर तुम्हीही प्लांट बेस्ड डाएटचा मार्ग अवलंबवू शकता. जाणून घेऊयात या डाएटबाबत...
काय आहे प्लांट बेस्ड डाएट?
प्लांट बेस्ड डाएट म्हणजे झाडांपासून मिळणारे पदार्थ. यामध्ये भाज्या, कडधान्य, धान्य, फळं, ड्रायफ्रुट्स आणि डाळी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त काही प्रमाणात अॅनिमल प्रोडक्ट्सचाही समावेश करण्यात येतो. कारण शरीराला आवश्यक असणारे काही व्हिटॅमिन्स आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्स मिळण्यासाठी अॅनिमल प्रोडक्ट्स उपयुक्त ठरतात.
खरचं प्लांट बेस्ड डाएट शरीरासाठी फायदेशीर ठरतात?
प्लांट बेस्ड डाएट प्लॅन संतुलित असण्यासोबतच शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्व पुरवण्यासाठी मदत करतो. जर तुम्ही व्यवस्थित प्लांट बेस्ड डाएट फॉलो केलं तर त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. या डाएटमध्ये लोअर बॉडी मास इन्डेक्सचा(बीएमआई) समावेश असतो. त्याचप्रमाणे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे डाएट उपयुक्त ठरतं.
अशी करा सुरूवात
जर तुम्ही मांसाहारी पदार्थांचे शौकीन असाल तर तुम्हाला प्लांट बेस्ड डाएट सुरू करताना थोडं अवघड जाईल. त्यामुळे हळूहळू मांसाहार बंद करून तुम्ही आहारात या डाएटचा समावेश करू शकता. जेवणामध्ये सलाडची मात्रा अधिक ठेवा. त्याचप्रमाणे बिर्यानीसारखा पदार्थ खाताना त्यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता. दिवसभरामध्ये चहा किंवा कॉफी ऐवजी लिंबू सरबत किंवा फळांच्या ज्यूसचं सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला हे डाएट फॉलो करणं थोडं सोपं होईल.
फळभाज्या ठरतील फायदेशीर
सुरूवातीला आपल्या आहारामध्ये फळभाज्यांचा समावेश करा. कोणत्याही पदार्थांमध्ये किंवा सलाडमध्ये तुम्ही यांचा समावेश करू शकता. या चवीसोबतच आरोग्यासाठीही लाभदायक ठरतात. यांचं सेवन केल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. तसेच हळूहळू तुम्हाला हे पदार्थ खाण्याची सवयही होते.
घरातून बाहेर असतानाही असं फॉलो करा 'प्लांट बेस्ड डाएट'
अनेकदा आपण बाहेर फिरायला किंवा पिकनिकला गेल्यावर बाहेरील पदार्थांचा आस्वाद घेण्यावर आपला जास्त भर असतो. पण जर तुम्ही मनाशी पक्कं केलतं तर तुम्ही बाहेर राहूनही तुमचं डाएट फॉलो करू शकता. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर असे पदार्थ ऑर्डर करा ज्यांमध्ये भाज्यांचा समावेश जास्त असेल. तुम्ही दूध, पास्ता यांसारखे पदार्थही खाऊ शकता.