चांगल्या आरोग्यासाठी झिंक गरजेचं, कमतरता असल्यास होतात या समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 10:33 AM2018-09-14T10:33:37+5:302018-09-14T10:35:53+5:30
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी शरीराला वेगवेगळे पोषक तत्वे मिळणे गरजेचे आहे.
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी शरीराला वेगवेगळे पोषक तत्वे मिळणे गरजेचे आहे. आयर्न आणि कॅल्शिअमप्रमाणेच झिंक हे पोषक तत्व सुद्धा शरीरासाठी महत्वाचं आहे. झिंकचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्यला होता. याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, त्वचेसाठी किंवा जखमांसाठीही हे फार महत्त्वाचं आहे.
झिंकची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, त्वचा कमजोर होणे, दृष्टी कमी होणे आणि इतरही अनेक समस्या होतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही बरा होऊ शकतो. चला जाणून घेऊया अशा काही पदार्थांबाबत ज्यातून तुम्हाला झिंक मिळतं.
शेंगदाणे
शेंगदाण्यातून झिंक अधिक प्रमाणात मिळतं. यासोबतच आयर्न, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड आणि फायबर मिळतं. तसेच यातून अॅंटी-ऑक्सिडेंट्स हे सुद्धा आढळतं. शेंगदाण्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं.
तीळ
तिळामध्येही अधिक प्रमाणात झिंक आढळतं. यासोबतच यात प्रोटीन, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी तत्वेही मिळतात. तसेच तिळातून फोलिक अॅसिडही भरपूर प्रमाणात मिळतं.
अंड्याचा पिवळा भाग
डॉक्टर अंड्याचा पिवळा बलक खाण्यास मनाई करतात, कारण यात कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतात. पण तुम्हाला झिंगची गरज पूर्ण करायची असेल तर तुम्हाला आहारात अंड्याच्या पिवळ्या बलकाचा समावेश करावा लागेल. अंड्याच्या पिवळ्या भागात कॅल्शिअम, आयर्न, फॉस्फोरस, थायमिन, व्हिटॅमिन बी६, फोलेट, व्हिटॅमिन बी १२ आणि पॅथोनिक अॅसिड आढळतं.
लसूण
लसणामध्येही अधिक प्रमाणात झिंक आढळतं. सोबत रोज लसणाची एक कळी खाल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, बी आणि सी सोबतच आयोडीन, आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्वेही मिळतात.