Food Recipe: पावसाळ्याचा वाढता गारठा आणि तोंडी लावायला करा अळिवाचे पौष्टिक लाडू!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:58 AM2023-08-16T09:58:43+5:302023-08-16T10:02:50+5:30

Monsoon food Recipe: पावसाळ्यात वरचेवर लागणाऱ्या भुकेला उत्तम पर्याय म्हणजे अळिवाचा लाडू; लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडणार याची गॅरेंटी!

Food Recipe: Make nutritious plum ladoo for the increasing cold of monsoons; it's really mouth watering! | Food Recipe: पावसाळ्याचा वाढता गारठा आणि तोंडी लावायला करा अळिवाचे पौष्टिक लाडू!

Food Recipe: पावसाळ्याचा वाढता गारठा आणि तोंडी लावायला करा अळिवाचे पौष्टिक लाडू!

googlenewsNext

पावसाळ्यात भूक जास्त लागते. त्यात तळणीचे पदार्थ खावेसे वाटत असले तरी ते पचायला जड म्हणून ठराविक प्रमाणात खावे लागतात. आयुर्वेदानुसार दमा, कफ व रक्ती मूळव्याध इ. व्याधींवर ही अळीव गुणकारी आहे. यातील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. म्हणून पावसाळ्यात  छोट्या मोठ्या भुकेसाठी तोंडी लावायला काय करावे याचा विचार करत असाल तर झटपट होणारे पौष्टिक आळिवाचे लाडू नक्की करून बघा. त्याची सोपी रेसेपी देत आहेत वैदेही भावे. (स्रोत: चकली ब्लॉगस्पॉट)

साहित्य:
४ कप नारळाचा चव
दिड कप गूळ
१/२ कप अळिव
१५ बदाम, सोलून पातळ काप
३ ते ४ टेस्पून चारोळी
३ ते ४ टेस्पून बेदाणे
१/२ टिस्पून जायफळ पूड

कृती:
१) अळीव नारळाच्या पाण्यात किमान २ ते अडीच तास भिजत ठेवावे.
२) कढई गरम करून त्यात भिजवलेले अळिव, खवलेला नारळ, आणि गूळ घालून मिक्स करावे. मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईस्तोवर ढवळावे.
३) मिश्रण घट्टसर झाले कि त्यात बदाम, चारोळी, बेदाणे आणि जायफळ पूड घालून मिक्स करावे. मिश्रण गरमसर असतानाच लाडू वळावेत.

टीप:
१) जायफळऐवजी वेलची पूडही वापरू शकतो.
२) जर नारळाचे पाणी नसेल तर साध्या पाण्यात अळीव भिजवले तरी चालतील.

Web Title: Food Recipe: Make nutritious plum ladoo for the increasing cold of monsoons; it's really mouth watering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.