Food Recipe: बापरे! भज्यांचे एवढे प्रकार? सुगरणींच्या पाककलेची कमाल; यापैकी तुम्ही कोणकोणते भजी प्रकार करता?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 01:59 PM2023-06-28T13:59:23+5:302023-06-28T13:59:43+5:30

Food Recipe: पावसाळा आणि भजी हे आपलं आवडतं समीकरण, मग कांदे आणि बटाटे भजीवरच ताव का मारायचा? वाचा भजीचे आणखी प्रकार... 

Food Recipe: Wow! Look, So many types of pakodas? Which of these types of pakoda do you make? | Food Recipe: बापरे! भज्यांचे एवढे प्रकार? सुगरणींच्या पाककलेची कमाल; यापैकी तुम्ही कोणकोणते भजी प्रकार करता?

Food Recipe: बापरे! भज्यांचे एवढे प्रकार? सुगरणींच्या पाककलेची कमाल; यापैकी तुम्ही कोणकोणते भजी प्रकार करता?

googlenewsNext

>> माधुरी घाटे-हळकुंडे 

पावसाळा आला आहे, वेगवेगळ्या भज्यांच्या पर्यायांची उजळणी करावी म्हटलं.

- बटाटा भजी
- कांद्याची खेकडा भजी
- कांद्याच्या रींग्ज 
- कांद्याची बोंडा भजी
- गोल भजी
- भेंडीची भजी
- कोबीची भजी
- फ्लॉवरची भजी (तुरे एकदा उकळत्या पाण्यातून काढायचे)
- अळूच्या पानांची भजी
- पालकाची भजी (अख्खी पानं किंवा बारीक चिरून)
- मिरचीची भजी
- पालक मेथीची भजी
- भरलेल्या मिरचीची भजी
- गिलक्यांची भजी
- ब्रेडची भजी
- ओव्याच्या पानांची भजी

अजून अनेक पदार्थांची अनेक प्रकारे भजी बनतात. मूगडाळ, चणाडाळ भिजवून, कच्च्या केळ्यांची, सुरणाची, बेबी कॉर्न इत्यादी इत्यादी. मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या दारात 'मायाळू' नावाचा वेल होता. गुलाबी देठांचा. त्याचीही भजी केली जात.

आज केलेल्या कोणत्याही प्रकारात खाण्याचा सोडा वापरलेला नाही. मूळात आम्ही घरात खाण्याचा सोडा हा प्रकार ठेवतच नाही. भजी कुरकुरीत, खमंग आणि टमटमीत बनण्यासाठी दोन नामी युक्त्या आहेत :

1. बेसनात एक लहान चमचा (tsp) तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ घालायचं
2. बेसनात हळद, तिखट, ओवा, आवडीप्रमाणे कुटलेले धणे किंवा तीळ, कोथिंबीर, मीठ कालवल्यावर तळणीचं कडकडीत तापलेलं दोन चमचे तेल त्यावर घालायचं. फक्त तेल टाकताना चरचरून आवाज येण्याएवढं गरम असायला हवं. बास, हे दोन उपाय म्हणजे खाण्याच्या सोड्याला कायमची सुट्टी आणि भजी फर्मास !

'न भूतो न भविष्यती' एवढी भजी आज एका दिवसात एकदम केली. शेवटचा घाणा निघेपर्यंत त्या वासाने मी भज्यांच्या दुकानात कामाला आहे असं वाटायला लागलं होतं. प्रत्येक प्रकारची 4-5 भजी करता करता संध्याकाळी घराबाहेर भज्यांची गाडी टाकावी लागते की काय इतकी भजी झाली. सगळी भजी मांडायला नेहेमीचं ताट पुरेना.

आज सकाळपासून जरा उघडीप होती. एरवी पावसाचे ढग दिसले तरी आमचा छोटा आग्या वेताळ "भजी भजी" करत नाचत सुटतो. आज उलटं झालं...भजी केली आणि पाऊस आला. 

Web Title: Food Recipe: Wow! Look, So many types of pakodas? Which of these types of pakoda do you make?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न