दररोजच्या आहारातील हे 7 पदार्थ 10 वर्षांपर्यंत टिकतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:33 PM2018-09-20T13:33:55+5:302018-09-20T13:35:12+5:30
कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात.
कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात. ऐकून थोडं नवल वाटलं असेल ना? जाणून घेऊयात आपल्या रोजच्या वापरातील अशा काही पदार्थांबाबत ज्यांचा वापर तुम्ही 10 वर्षांनंतरही करू शकता.
1. राजमा
राजमा एक असा पदार्थ आहे जो तुम्ही काही वर्षांनंतरही वापरू शकता. अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, राजमा किंवा काही कडधान्य 30 वर्षांपर्यंत साठवून ठेवता येऊ शकतं.
2. मीठ
मिठाशिवाय आपलं जेवणं अपूर्ण समजलं जातं. आपल्या रोजच्या वापरातील मीठ हे दीर्घकाळ टिकणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. मीठ नीट साठवून ठेवलं तर ते अनेक वर्ष टिकते.
3. मध
मध तयार करताना त्यामध्ये केमिकल्स मिक्स करण्यात येतात. त्यामुळे ते वर्षानुवर्षे टिकण्यास मदत होते. जर मध सीलपॅक डब्ब्यामध्ये ठेवलं तर ते कधीच खराब होत नाही. तुम्ही अनेक वर्ष ते वापरू शकता.
4. व्हाइट व्हिनेगर
व्हाइट व्हिनेगरचा वापर फिश फूड तयार करण्यासाठी करण्यात येतो. फक्त खाण्याच्या पदार्थांमध्येच नाही तर घरातील स्वच्छतेसाठीही याचा वापर केला जातो. हे व्हिनेगर थंड आणि प्रकाश नसलेल्या ठिकाणी ठेवलं तर ते कधीच खराब होत नाहीत.
5. साखर
साखर एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका नसतो. त्यामुळे साखर वर्षानुवर्ष साठवून ठेवता येते. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे साखर बरेच दिवस साठवून ठेवायची असले तर ती एअरटाइट कंटेनरमध्ये साठवून ठेवावी.
6. सोया सॉस
सोया सॉसमध्ये सोडियमची मात्रा अधिक असते. त्यामुळे यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण फार कमी असते. जर व्यवस्थित ठेवलं तर सोया सॉस अनेक वर्ष सोया सॉस जसाच्या तसा राहतो.
7. तांदूळ
जर तुम्ही कच्चे तांदूळ पाणी आणि बाष्पापासून दूर ठेवले तर त्याचा उपयोग 30 वर्षांनंतरही करता येतो. तांदूळ व्यवस्थित स्टोअर करून ठेवण्यासाठी शक्य तो 4.5 डिग्री सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे.