मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:58 PM2018-10-17T12:58:59+5:302018-10-17T12:59:59+5:30
अनेक जणं खाण्याचे शौकीन असतात. त्यांना अनेक नवीन पदार्थ खाण्याची आणि चाखण्याची आवड असते. आपण खात असलेल्या पदार्थांचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो.
अनेक जणं खाण्याचे शौकीन असतात. त्यांना अनेक नवीन पदार्थ खाण्याची आणि चाखण्याची आवड असते. आपण खात असलेल्या पदार्थांचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, काही पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यातील काही पदार्थ आपली स्मरणशक्ती वाढवतात. तर काही आपल्या मेंटल हेल्थसाठी फायदेशीर असतात. जाणून घेऊया काही पदार्थांबाबत...
करी (जास्त तेल असणारे पदार्थ)
ज्या पदार्थांमध्ये जास्त तेलाची असते, त्या पदार्थांमध्ये मसाले अधिक प्रमाणात असतात. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, हे मसाले तुमच्या मेंटल हेल्थसाठी फायदेशीर ठरतात. मसाल्याच्या पदार्थांमध्ये असणाऱ्या हळदीमध्ये अॅन्टी-इनफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे डिमेंशियाचा (विसरण्याचा आजार) धोका कमी होतो. त्याचप्रमाणे ब्रेन सेल्सदेखील वाढतात.
छोले
चन्यामध्ये मॅग्नेशिअम लेव्हल मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे तुमची झोप वाढण्यासाठी मदत होते. परिणामी डोक शांत राहून शार्पनेस वाढवण्यास मदत होते. त्यामुळे यांना तुम्ही सलाड किंवा भाजी कोणत्याही स्वरूपात तयार करून खाऊ शकता.
कॉफी
संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, कॅफेनमुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते, त्याचप्रमाणे शॉर्ट टर्म मेमरी वाढण्यासही मदत होते. त्यामुळे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवण्याची इच्छा असेल तर दिवसातून दोन कप तरी कॉफी पिणं गरजेचं असतं.
ड्रायफ्रुट्स
ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणावर फॅटी अॅसिड असतं. याचं काम मेंदूमधील प्रत्येक नर्व सेल्सचं मेंब्रेन वाढवणं असतं. ड्रायफ्रुट्समध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असून ते मेंटल हेल्थसाठी फायदेशीर ठरतं.