सावधान! विषारी आहे मूग आणि मसूर डाळ, जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:46 AM2018-10-25T09:46:49+5:302018-10-25T10:16:23+5:30
भारतीयांच्या आहारातील प्रमुख भाग म्हणजे वेगवेगळ्या डाळी. मग ते दुपारचं जेवण असो वा रात्रीचं....
भारतीयांच्या आहारातील प्रमुख भाग म्हणजे वेगवेगळ्या डाळी. मग ते दुपारचं जेवण असो वा रात्रीचं....डाळीशिवाय जेवण अपुरं वाटतं. डाळींमध्ये मूंग आणि मसूरची डाळ सर्वात पौष्टिक मानली जाते. पण तुम्हाला आता तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण जी डाळ तुम्ही हेल्दी म्हणून खात आहात ती तुमच्या शरीरासाठी विषारी ठरु शकते.
कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातून आयात होते डाळ
फूड सेफ्टी अॅंड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI च्या नव्या शोधानुसार ही बाब समोर आली आहे की, भारतात कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातून मोठ्या प्रमाणात मूग आणि मसूरची डाळ आयात केली जाते. या डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी तत्व आढळले आहेत. फूड सेफ्टी अथॉरिटीने ग्राहकांना इशारा दिला आहे की, या डाळींचं सेवन लगेच बंद करा. कारण लॅब टेस्टींगमध्ये डाळींच्या सॅम्पलमध्ये मोठ्या प्रमाणात हर्बीसाइड ग्लाइफोसेट नावाचं केमिकल आढळलं आहे.
या प्रकाराबाबत FSSAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात हर्बीसाइड ग्लायफोसेटच अधिक प्रमाणात असण्याची शक्यता आहे. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. FSSAI कडून कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही की, डाळींमध्ये ग्लायफोसेटचं प्रमाण किती असावं. त्यामुळे फूड सेफ्टी अथॉरिटीने अधिकाऱ्यांना कॅनडामध्ये हर्बीसाइडचं स्टॅंडर्ड काय आहे याची माहिती काढण्यास सांगितलं आहे.
डाळींमध्ये ग्लायफोसेटचं प्रमाण अधिक
इतकेच नाही तर कॅनेडियन फूट इंस्पेक्शन एजन्सीने कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आलेल्या मूग आणि मसूर डाळीच्या हजारो सॅम्पलची टेस्ट केली. ज्यात २८२ पार्ट्सवर बिलियन आणि १ हजार पार्ट्सवर बिलियन ग्लायफोसेट आढळले. हे प्रमाण कोणत्याही स्टॅंडर्डच्या हिशोबाने अधिक आहे.
दूषित आहाराचं सेवन
फूड अथॉरिटीकडून याचा अभ्यास तेव्हा केला गेला जेव्हा एका सामाजिक कार्यकर्त्याने यावर आवाज उठवला. त्यांनी म्हटले होते की, भारतीय आहात अनेक वर्षांपासून दूषित आणि भारतीयांना ग्लायफोसेटच्या स्टॅंडर्ड क्वालिटीबाबत काहीच माहिती नाही.
डाळ खाण्यासाठी WHO ची सूचना
हर्बीसाइड ग्लायफोसेटला काही वर्षांआधीपर्यंत सुरक्षित मानले जात होते. पण नुकत्याच WHO ने जारी केलेल्या सूचनेमध्ये लोकांना अपील करण्यात आले आहे की, या डाळींचं सेवन बंद करावे. कारण यात कॅन्सरची लागण करणारे तत्व आढळले आहेत.
ग्लायफोसेटमुळे फेल होऊ शकते किडनी
ग्लायफोसेटचा वापर शेतीत गवत आणि शेवाळ नष्ट करण्यासाठी केला जातो. हे फार विषारी असून याचा मानवी शरीरावर फार वाईट परिणाम होतो. याने शरीरातील प्रोटीनशी निगडीत कार्यांना नुकसान पोहोचतं. इम्यूनिटी सिस्टम खराब होते. सोबतच आवश्यक व्हिटमिन्स, मिनरल्स आणि पोषक तत्वांना शोषूण घेण्याची प्रक्रियाही थांबवली जाते. काही गंभीर केसेसमध्ये असेही आढळले आहे की, ग्लायफोसेटमुळे किडनीही निकामी होते.