अवघ्या 10 मिनिटांत तयार करा टेस्टी आणि हेल्दी गाजर हलवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 02:23 PM2019-01-14T14:23:55+5:302019-01-14T14:24:50+5:30
हिवाळा ऐन मध्यावर आलेला असातानाच जीभेला गारजाराच्या हलव्याचे वेध लागलेच असतील. बाजारातही लाल-लाल गाजरांची आवाक वाढली असून घराघरांमध्ये गाजर हलवा तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे.
हिवाळा ऐन मध्यावर आलेला असातानाच जीभेला गारजाराच्या हलव्याचे वेध लागलेच असतील. बाजारातही लाल-लाल गाजरांची आवाक वाढली असून घराघरांमध्ये गाजर हलवा तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. गाजर आरोग्यसाठी पौष्टिक असतं, हे तर आपण सारेच जाणतो. त्यामुळे गाजराचा हलवाही शरीरासाठी आरोग्यदायी ठरतो. हा हलवा तयार करण्यासाठीही अत्यंत सोपा असतो. फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही गाजर हलव्याची क्रेझ पाहायला मिळते.
थंडीमध्ये गोड पदार्थांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. हा घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून तयार करता येतो. खरं तर हा तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. परंतु आज आम्ही 5 मिनिटांमध्ये गाजराचा हलवा तयार करण्याती रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत.
साहित्य :
- गाजर 1 किलो
- मिल्क पावडर अर्धा कप
- 2 मोठे चम्मचे तूप
- एक कप साखर
- 5 वेलची
- बारिक कापलेले ड्रायफ्रुट्स
कृती :
- सर्वात आधी गाजर पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.
- त्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून मिक्सरच्या सहाय्याने जाडसर बारिक करून घ्या.
- गॅसवर मोठी कढई ठेवून मंद आचेवर तयार पेस्ट पाणी निघून जाईपर्यंत शिजवून घ्या.
- यामध्ये दूध किंवा पाणी एकत्र करू नका. त्यामुळे हे गाजर शिजण्यासाठी फार वेळ लागणार नाही.
- आता यामध्ये साखर, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर एकत्र करून शिजवून घ्या.
- लक्षात ठेवा साखर एकत्र केल्यानंतर मिश्रणाला थोडं पाणी सुटेल.
- पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- आता एका बाउलमध्ये मिल्क पावडर आणि मोठा चमचा तूप एकत्र करून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- असं केल्यामुळे इन्स्टंट खवा तयार होईल.
- आता हा खवा हलव्यामध्ये एकत्र करा आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा तूप टाका.
- आता हे मिश्रण जवळपास 1 ते 2 मिनिटांपर्यंत गॅसवर शिजवून घ्या.
- मिश्रण तूप सोडू लागल्यावर गॅस बंद करा.
- गरमा गरम गाजराचा हलवा तयार आहे.