#BappachaNaivedya : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक नक्की ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:17 AM2018-09-12T11:17:37+5:302018-09-12T12:35:24+5:30
#BappachaNaivedya : कोणतंही काम करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला मोदक फार आवडतात. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.
Ganesh Chaturthi 2018 : कोणतंही काम करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला मोदक फार आवडतात. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. बाजारांमध्ये अनेक प्रकारचे मोदक आढळून येतात. अनेकदा घरी वेळ नसल्यामुळे बाजारातूनच मोदक आणून नैवेद्य दाखवण्यात येतो. पण तुम्ही घरच्या घरीही अगदी कमी वेळात मोदक तयार करू शकता. आज जाणून घेऊयात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरी तयार करण्याच्या पद्धती...
1. पारंपारिक मोदक
तांदळाच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या या मोदकांमध्ये खोबरं आणि गूळाचं सारण भरण्यात येतं. त्यानंतर हाताने किंवा साच्यामध्ये टाकून तुम्ही याला मोदकाचा आकार देऊ शकता. त्यानंतर हे मोदक वाफवून घ्यावे. खाण्यासाठी चविष्ट असे उकडीचे मोदक तयार आहेत.
2. फ्राइड मोदक
पारंपारिक मोदकांपेक्षा हटके स्टाइलने मोदक तयार करायचे असतील तर तुम्ही फ्राइड मोदक तयार करू शकता. यासाठी तांदळाचं पिठ आणि गुळ, खोबऱ्यासोबत मोदक तयार करून त्याला तेल किंवा तूपामध्ये तळून घ्यावे.
3. चॉकलेट मोदक
चॉकलेट म्हटलं की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बाप्पासाठीही तुम्ही चॉकलेटचे मोदक तयार करू शकता. हे मोदक कंडेन्स मिल्क आणि कोको पावडरपासून तयार करण्यात येतात.
4. मोदक पेढा
केसर पेढा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोदक पेढाही तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही आधी घरच्या घरी केसरचा पेढा तयार करून घ्या. नंतर मोदकाच्या साच्याचा वापर करून त्याला मोदकाचा आकार देऊ शकता.
5. चॉकलेट आणि खोबऱ्याचे मोदक
चॉकलेट आणि नारळापासून तयार करण्यात आलेला मोदक फर कमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे. खोबरं आणि साखरेच्या सारणाचा मोदक तयार करू शकता.