Ganesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 11:32 AM2019-09-02T11:32:16+5:302019-09-02T11:32:52+5:30

गणेशोत्सवाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात झाली असून बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे प्रसन्नमय वातावरण झालं आहे. घराघरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे.

Ganesh Chaturthi 2019 : Health benefits of eating modak on ganesh chaturthi | Ganesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलं

Ganesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलं

Next

गणेशोत्सवाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात झाली असून बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे प्रसन्नमय वातावरण झालं आहे. घराघरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच गणरायाला आवडणारे मोदक तर घराघरात तयार केलेच असतील. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मोदक बाप्पाला फार प्रिय आहेत. पण कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की, बाप्पाला आवडणारे मोदक फक्त मिठाई नसून आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला मोदक खाण्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगणार आहोत... 

आरोग्यदायी ठरतात मोदक 

मोदक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात आणि खाण्यासाठीही चविष्ट असतात. कदाचित यामुळेच त्यांना अमृततुल्य समजलं जातं. मोदक तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाचं पिठ, शुद्ध तूप, खवा, गुळ आणि खोबरं यांसोबत एकत्र करून वाफवून तयार करण्यात येतं. 

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी उत्तम असतो गुळ 

मोदकामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करण्यात येतो. गुळ पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम मानला जातो. तसेच बद्धकोष्टाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. एवढचं नाहीतर गुळ, अॅन्टिऑक्सिडंट आणि पोषक तत्वांनी भरपूर असतात. जे लिव्हर, आंतडी आणि पोटाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. तसेच टॉक्सिन्स शरीरातून बाहेर टाकण्यासाठीही मदत करतात. 

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खोबरं

मोदक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं सारण हे ओल्या खोबऱ्यापासून तयार करण्यात येतं. ओल्या खोबऱ्यामध्ये असलेलं ट्रायग्लिसराइड्स हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम मानलं जातं. तसेच ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतात. 

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी तूप 

मोदक तयार करण्यासाठी शुद्ध तूपाचा वापर करण्यात येतो. तूपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के मुबलक प्रमाणात असतात. जे हाडांसाठी, मेंदूसाठी, हृदयासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी उत्तम मानलं जातं. त्याचबरोबर गायीच्या दूधापासून तयार करण्यात आलेलं शुद्ध तूप हृदयासाठी फायदेशीर ठरतं आणि वजन कमी करण्यासाठीही मदत करतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Ganesh Chaturthi 2019 : Health benefits of eating modak on ganesh chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.