Ganesh Chaturthi 2020 : यंदा बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा रेखीव, सुबक उकडीचे मोदक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:46 PM2020-08-19T16:46:50+5:302020-08-19T16:50:21+5:30
अनेकदा व्यवस्थित मोदकांचा बेत फसतो. ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील.
प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेकदा हे मोदक बाजारातून विकत आणले जातात. पण फेस्टिव्ह सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या मिठाईमध्ये भेसळ आढळून येते. या भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो.
अनेकदा व्यवस्थित मोदकांचा बेत फसतो. ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील. अत्यंत कमीतकमी वेळात तुम्ही बाप्पाला नैवेदय दाखवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोपी आणि झटपट होणारी उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगणार आहोत.
उकडीच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य :
४ वाट्या तांदळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
उकडीचे मोदक तयार करण्याची कृती :
- एका भांड्यामध्ये तूप घ्या.
- त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या.
- प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.
- थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका.
- पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदळाची पिठी घाला.
- नीट एकत्र करून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ घ्या.
- थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्या.
- उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मध्ये घोळवून घ्या.
- उकडीला खोलगट वाटीचा आकार द्या.
- त्यामध्ये खोबरं आणि गुळाचं शिजवलेलं सारण भरा.
- त्यानंतर वाटीला एक एक करून पाकळ्या काढा. पाकळ्या जितक्या जवळ आणि सारख्या अंतरावर असतील तेवढा मोदक आकर्षक दिसेल.
- त्यानंतर तळव्यावर ठेवून बोटांच्या साहाय्याने पाकळ्या बंद करून वरच्या बाजूला टोक ठेवा.
- रेखीव आणि मुलायम उकडीचे मोदक बाप्पासाठी तयार आहेत.
हे पण वाचा-
चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी
चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....