Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:50 AM2019-09-05T11:50:12+5:302019-09-05T11:51:38+5:30

घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत. 

Ganesh Festival 2019 : Ganeshotsav healthy recipe of gavhachi kheer or gehun ki kheer prepared during ganapati festival | Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर'

Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर'

Next

घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत. 
आज आम्ही जी रेसिपी सांगणार आहोत ती थोडीशी युनिक असून आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवात काही घरात हा पदार्थ हमखास तयार करण्यात येतो. चविष्ट आणि पौष्टिक असा हटके पदार्थ म्हणजे, गव्हाची खीर. 

गव्हाची खीर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • 200ग्रॅम गव्हाची कणी कंवा दलिया 
  • 2 चमचे तूप 
  • 10-12 मणुके किंवा इतर ड्रायफ्रुट्स 
  • चिमुटभर वेलची पावडर 
  • 200 ग्रॅम गुळ किंवा गुळाची पावडर 
  • दूध

 

अशी तयार करा गव्हाची खीर : 

- जर तुम्ही दलियाचा वापर करणार असाल तर साधारणतः तासाभरासाठी पाण्यात भिजत ठेवा. जर गव्हाचा वापरत असाल तर सर्वात आधी गहू पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर जाडसर वाटू घ्या. 

- एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवा. आता त्यामध्ये दलिया एकत्र करून परतून घ्या. 

- आता यामध्ये मणुके किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स एकत्र करा. तसेच वेलची पूज आणि काजूची पावडर व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

- गुळ एकत्र करून घ्या आणि एक मिनिटासाठी शिजवून घ्या. 

- मिश्रणात एक कप पाणी एकत्र करा. मिश्रण सतत एकत्र करत राहा. त्यामुळे मिश्रण एकजीव होण्यास मदत होईल. 4 ते 5 मिनिटांसाठी मिश्रण एकजीव करा. 

- मंद आचेवर मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये हळूहळू दूध एकत्र करा आणि तोपर्यंत शिजवून घ्या, जोपर्यंत ते व्यवस्थित एकजीव होत नाही. 

- मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा

- पौष्टिक आणि चविष्ट गव्हाची खीर तयार आहे. 

Web Title: Ganesh Festival 2019 : Ganeshotsav healthy recipe of gavhachi kheer or gehun ki kheer prepared during ganapati festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.