Ganesh Utsav Special Recipe : चवीला भारी तितकेच पौष्टीक केशरी ड्रायफ्रुट मोदक; बाप्पासह घरातील मंडळीही होतील खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:02 PM2021-09-07T18:02:05+5:302021-09-07T18:19:11+5:30
Ganesh Utsav Special Recipe : . ड्रायफ्रुट्स, तूप आपल्या शरीराला, हाडांना पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात. मग जाणून घ्या या पौष्टीक मोदकांची रेसेपी
गणेशोत्सवात मोदकांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यापैकी उकडीचे मोदक, तळलेले मोदक, काजू मोदक हे प्रकार तुम्ही अनेकदा खाल्ले असतील. नेहमी उकडीचे मोदक बनवण्यापेक्षा यावर्षी काय वेगळं करता येईल या विचारात तुम्ही असाल तर आज आम्ही तुम्हाला केशरी मोदकांची भन्नाट रेसेपी सांगणार आहोत. हे मोदक चवीचा चांगले तितकेच पौष्टीकही असतात. कारण यात भरपूर ड्रायफ्रुट्स घातले जातात. ड्रायफ्रुट्स, तूप आपल्या शरीराला, हाडांना पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात. मग जाणून घ्या या पौष्टीक मोदकांची रेसेपी
केशरी मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
खवा
वेलची पूड
केशर आवश्यकतेनुसार
पिठी साखर
ड्रायफ्रुट्स
तूप
केशरी मोदक तयार करण्याची कृती :
१) गॅसवर एक पॅन ठेवून मध्यम आचेवर तूप गरम करत ठेवा.
२) पॅन गरम झाल्यानंतर किसलेला खवा आणि पिठी साखर एकत्र करा.
३) 5 ते 10 मिनिटांसाठी परतून घ्या. लक्षात ठेवा की, साखर पूर्णपणे विरघळणं आवश्यक आहे.
४) मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर खवा व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करा. त्यामध्ये वेलची पूड एकत्र करून मिश्रण थंड होण्यास ठेवा.
५) तयार मिश्रण दोन बाउलमध्ये काढून घ्या. एका बाउलमधील मिश्रणात ड्रायफ्रुट्स एकत्र करा तर दुसऱ्या भागामध्ये केशर एकत्र करा.
६) आता मोदकांचा साचा घेऊन एका बाउलमधील मिश्रण घेऊन त्याला अर्धवर्तुळाकार देऊन साच्यामध्ये टाका. आता दुसऱ्या बाउलमधील मिश्रण घेऊन साच्यातील उरलेल्या भागामध्ये एकत्र करा. असं केल्याने मोदकाचा अर्धा भाग केशरी आणि अर्ध्या भागामध्ये ड्रायफ्रुट्स असा मोदक तयार होइल.
७) टेस्टी आणि हेल्दी केशरी मोदक तयार आहे.