रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 03:26 PM2020-03-14T15:26:36+5:302020-03-14T15:36:46+5:30

कोरोना सारख्या जीवघेणा व्हायरसचं इन्फेक्शन होऊ नये असं वाटत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे. 

Garlic chutney will increase the immune system and prevent from infection myb | रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....

रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....

googlenewsNext

(image credit- craftlog)

सध्या कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने उपाय शोधले जात आहेत. अशा परिस्थितीत रोजच्या आहारातून काही पदार्थांचा समावेश केल्यास तुम्हाला  इन्फेक्शनपासून दूर राहता येईल. चला तर मग जाणून घेऊया असे लसणाचा आहारात समावेश करून तुम्ही कसं स्वतःला निरोगी ठेवू शकता. लसणाचा आहारात समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता.  कारण कोरोना सारख्या जीवघेणा व्हायरसचं इन्फेक्शन होऊ नये असं वाटत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कच्च्या लसणाचा आहारात समावेश करायला हवा. कच्चा लसूण खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणा एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात. त्यासाठी कच्चा लसूण  खाण्याची काही गरज नाही. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही लसणाची चटणी सुद्धा खाऊ शकता. चला तर मग  जाणून  घेऊया कशी तयार करायची लसणाची चटणी.


साहित्य:

१० मोठ्या लसूण पाकळ्या किंवा १ मध्यम लसणीचा गड्डा

चवीपुरते मीठ (साधारण १/२ टीस्पून)

४ ते ५ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट (भरड)

१/२ टीस्पून आमचूर पावडर

१ टीस्पून लाल तिखट

२ टेस्पून तेल. ( हे पण वाचा- फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही)

कृती:

लसूण सोलून चिरून घ्यावी. खलबत्ता तयार ठेवावा. त्यात १ टीस्पून लाल तिखट घालून ठेवावे.

 फोडणीसाठी लहान भांडं घेऊन त्यात तेल गरम करावे. तेलात लसूण घालून लसूण थोडी ब्राऊन होईस्तोवर परतावी. हि फोडणी लाल तिखटावर घालावी आणि चमच्याने ढवळावे.

या मिश्रणात मीठ, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर घालावी आणि चांगले कुटून काढावे.

हि चटणी पराठा, डोसा, किंवा नेहमीच्या जेवणात  खाऊ शकता. ( हे पण वाचा-चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !)

(credit- chakliblogspot)

Web Title: Garlic chutney will increase the immune system and prevent from infection myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.