हॉटेलसारखे फ्रेंच फ्राईज आता घरी करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:40 PM2018-07-28T18:40:57+5:302018-07-28T18:41:59+5:30
फ्राईज अर्थात फिंगर चिप्स सगळ्यांना आवडतात. पण हॉटेलसारखे होत नाही अशी तक्रारही असते. पण आता काळजी नको, आम्ही देत आहोत फ्रेंच फ्राईजची अशी रेसिपी जी तुम्हाला हॉटेलची आठवणही येऊ देणार नाही.
फ्रेंच फ्राईज अर्थात फिंगर चिप्स सगळ्यांना आवडतात. पण हॉटेलसारखे होत नाही अशी तक्रारही असते. पण आता काळजी नको, आम्ही देत आहोत फ्रेंच फ्राईजची अशी रेसिपी जी तुम्हाला हॉटेलची आठवणही येऊ देणार नाही.
साहित्य :
बटाटे
तेल
मीठ
कृती :
बटाटा सोलून त्याचे उभे मध्यम जाड काप करून घ्या. हे काप शक्यता एकसारखे असावेत म्हणजे सारखे तळले जातात.
बटाट्याचे काप कोमट पाण्यात टाकावेत. त्यामुळे ते काळे पडत नाहीत आणि स्टार्च कमी होण्यात मदत होते.
गॅसवर पाणी गरम करून त्यात पाव चमचा मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यात बटाट्याचे काप घालून झाकण ठेवावे व गॅस बंद करावा.
पाच मिनिटांनी पाणी काढून बटाट्याचे काप कॉटनच्या कापडावर कोरडे करून घ्यावेत.
हे काप गार झाल्यावर एक तास फ्रीजमध्ये ठेवावेत.
गॅसवर कढईत पुरेसे (काप बुडतील इतके) तेल घेऊन ते तापवावे. तापल्यावर गॅस मध्यम ठेवून काप तळावेत. तळताना गॅस फार लहान किंवा मोठा नसावा.
एकसारखे टाळून रंग बदलायला लागल्यावर काप खाली काढावेत. तेल निथळल्यावर सर्व्ह करण्यापूर्वी पुन्हा एकदा तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत.
गरमागरम फ्रेंच फ्राईज तयार. चवीपुरते मीठ टाकून खाण्यास घ्यावेत. यात तयार चाट मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा पेरीपेरी मसाला आवडत असल्यास टाकता येईल. सॉस किंवा मेयॉनिजसोबत हे उत्तम लागतील.