चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 05:24 PM2020-08-16T17:24:15+5:302020-08-16T17:33:58+5:30

पावसाळ्यात ताजी आळूंची पान बाजारात दिसायला सुरूवात होते. दिसताच क्षणी अळूवडी खाण्याचा मोह आवरता येत नाही.

Great taste, Crispy aaluvadi Recipe | चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....

चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....

Next

(Image  Credit- dipsdiner.com, YouTube)

कांदा भजी, कोथिंबीरवडी असे पदार्थ आपण नेहमीच  करत असतो. पण पावसाळ्यात वेगळं काहीतरी खाण्याचं मन होतं. कारण बाजारात वेगवेगळे पदार्थ, रानभाज्या उपलब्ध होतात.  वेगवेगळ्या ताज्या भाज्याचे ऑपशन्स असल्यामुळे आपण नेहमीच नवीन काहीतरी तयार करण्याच्या प्रयत्नात असतो. पावसाळ्यात ताजी आळूंची पान बाजारात दिसायला सुरूवात होते. दिसताच क्षणी अळूवडी खाण्याचा मोह आवरता येत नाही.

दुकानात आपल्याजरी वर्षभर आळूवड्या उपलब्ध असल्यातरी घरी तयार केलेल्या आळूवड्या खाण्याची मजा काही वेगळीच...... अनेकांना कुरकरीत, खुसखुसीत, तर काही  तीळ घालून परतून घेतलेल्या आळूवड्या आवडतात. विशेष म्हणजे आळूवड्यात करताना चिंच आणि गुळ वापरल्यामुळे छान आंबट गोड चव येते. चला तर मग जाणून घेऊया कशा तयार करायच्या आळूवड्या.

साहित्य:

अळू वड्यांसाठी असलेली अळूची पाने ४ किंवा ६
३/४ ते १ कप चणाडाळपीठ
१ टेस्पून तांदूळ पीठ
१/४ कप चिंच (घट्ट कोळ)
२ टेस्पून किसलेला गूळ
१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, एकेक टिस्पून धणे-जिरे पूड चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:

१) चण्याच्या डाळीचं पिठ, तांदूळ पिठ, चिंच कोळ, गूळ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, १ चमचा तेल, चवीपुरतं मिठं घालून मिक्स करावे. घट्टसर करून घ्यावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. मिश्रण पातळ नसावे तसेच एकदम घट्ट गोळासुद्धा नसावा. मिश्रण जरा चिकटसर होईल. अळूच्या पानावर मिश्रणाचा पातळ थर पसरवता येईल इतपत मिश्रण घट्ट असावे.

२) पानं धुवून कापडानं पुसून घ्या देठ कापून टाका. पान उलटे ठेवून त्यावर लाटणे फिरवावे. पानावर मिश्रणाचा पातळ लेयर लावावा. त्यावर दुसरे पान तसंच उलटे ठेवून त्यावर मिश्रण लावावे. तिन्ही पाने तशीच करावीत. खालच्या बाजूकडून लहान बाजूला घट्ट गुंडाळी करावी. गुंडाळताना थोडे थोडे मिश्रण लावावे. तयार उंडे मोदकाप्रमाणे वाफेवर उकडावेत. गार झाले कि चकत्या कापून तळावेत किंवा शालो फ्राय करावेत. तयार आहेत खमंग अळूवड्या.

हे पण वाचा-

चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी

रोज भिजवलेले शेंगदाणे खाल्यानं टळेल 'या' आजारांचा धोका; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Web Title: Great taste, Crispy aaluvadi Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.