आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो गूळ; असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:23 PM2019-10-07T12:23:08+5:302019-10-07T12:36:54+5:30
जेवल्यानंतर अनेकांना काही 'कुछ मीठा हो जाये म्हणत' काहीना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा.
जेवल्यानंतर अनेकांना काही 'कुछ मीठा हो जाये म्हणत' काहीना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा. काहीतरीच नाही, खरं सांगतोय... गूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असणारा गूळ अनेक समस्यांवर गुणकारी ठरतो. ज्यामध्ये आयर्न, पोटॅशिअम, गंधक, फॉस्फरस, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ही मुबलक प्रमाणात आढळून येतं. गुळ खाल्याने फक्त आपलं रक्त स्वच्छ होत नाहीतर शरीरातील मेटाबॉलिज्मची पातळीही नियंत्रणात राहते. त्यामुळे गूळ वजन कमी करण्यासाठी मदत करतो. कसं ते जाणून घेऊया...
गूळ कमी करतो कॅलरी
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर डाएटमध्ये साखरऐवजी गुळाचा वापर करा. कारण साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कॅळरीचे प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे तुम्ही याचा वापर नॅचरल स्वीटनर म्हणूनही करू शकता.
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी
आयुर्वेदातही गुळाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गूळ रक्त स्वच्छ करून रक्त वाढवतो. तसेच गूळ खाल्याने भूकही लागते. तसेच गॅस, अपचन किंवा अॅसिडीटीसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर यावर उपाय म्हणून गळू खाऊ शकता. गूळ सैंधव मीठ, काळं मीठ एकत्र करून खाल्याने आंबट ढेकर येणं बंद होतं.
शरीर करा डिटॉक्स
गूळ, रक्त स्वच्छ करून शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. जसं ग्रीन टी शरीर डिटॉक्स करून वजन कमी करते तसचं गूळ शरीर डिटॉक्स करून वजन कमी करण्याचं काम करतो.
मेटाबॉलिज्मचा रेट वाढवतो गूळ
गुळामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मचा रेट वेगाने वाढतो आणि जेव्हा शरीराचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो. तेव्हा कॅलरी बर्न करून वेगाने वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.
मर्यादेत करा सेवन
तसं पाहायला गेलं तर गूळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो आणि अनेक आजार दूर करण्यासाठीही मदत करतो. पण तरिसुद्धा कोणताही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्याने शरीराला काही समस्या होऊ शकतात. त्यामुळे गूळाचं सेवनही प्रमाणात करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)