नारळाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:01 PM2018-10-30T15:01:16+5:302018-10-30T15:02:43+5:30
नारळाचे अनेक फायदे आहेत. मग त्याचा वापर तुम्ही कोणत्याही स्वरूपात केला तरीदेखील त्याचे अनेक फायदे आहेत. सुका मेवा म्हणूनही याचा उपयोग करता येऊ शकतो.
नारळाचे अनेक फायदे आहेत. मग त्याचा वापर तुम्ही कोणत्याही स्वरूपात केला तरीदेखील त्याचे अनेक फायदे आहेत. सुका मेवा म्हणूनही याचा उपयोग करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे नारळाचे तेलही आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर लांब केस, तजेलदार त्वचा आणि निरोगी आरोग्य पाहिजे असेल तर आहारामध्ये नारळाचा किंवा खोबऱ्याचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
100 ग्रॅम खोबऱ्यामधील पोषक तत्व :
- कॅलरी - 345
- फॅट्स - 33 ग्रॅम
- सोडिअम - 20 मिलिग्रॅम
- पोटॅशिअम - 356 मिलीग्रॅम
- कार्बोहायड्रेट्स - 15 ग्रॅम
- साखर - 6 ग्रॅम
- प्रोटीन - 3.3 ग्रॅम
नारळाचे फायदे :
- खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशिअम, प्रोटीन, अमीनो अॅसिड, फायबर, कार्बोहायड्रेट्स यांसारखी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे फायदेशीर ठरतात.
- मेंदूला चालना मिळण्यासाठी फायदेशीर ठरतं.
- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी मदत करतं.
- नारळामध्ये असलेलं फायबर बद्धकोष्ठासारख्या समस्या दूर करतं.
- ज्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतील त्यांनी दररोज खोबऱ्याचं सेवन करणं टाळावं.
- नारळाचं पाणी आणि खोबरं अॅन्टीबायोटिकप्रमाणे काम करतं त्यामुळे शरीरावर होणाऱ्या अॅलर्जीपासून बचाव होतो.
- नारळ म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलचा स्त्रोत मानलं जातो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं.
- यामध्ये फॅटी अॅसिड आढळून येतं. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी हे मदत करतं.
- नारळामध्ये अॅन्टी-कॅन्सर आणि अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात.
- छातीत जळजळ होत असेल किंवा अॅसिडीटीच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचं पाणी फायदेशीर ठरतं.
- नारळामध्ये लॉरिक अॅसिड आढळून येतं जे शरीरात असलेलं खराब व्हायरस नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतं.
असा करा आहारात समावेश करा :
नारळाच्या पाणी थंड असतं त्यामुळे सकाळी अनोशापोटी किंवा दुपारी घेतल्याने अनेक फायदे होतात.
संपूर्ण दिवसात कच्च्या नारळाच्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा तरी खा.
दररोज निदान दोन चमचे तरी नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करा