स्वातंत्र्यपूर्वीपासून येथील पुरीभाजी आहे फेमस ; तुम्ही ट्राय केलीत का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:31 AM2019-08-28T11:31:39+5:302019-08-28T11:32:58+5:30
पुण्यात आहात आणि तुम्हाला पुरी भाजी खायची आहे तर स्वातंत्र्यपूर्वी पासूनच हे हाॅटेल आहे तुमच्यासाठी
पुरी भाजी हा तसा आपल्या सर्वांचाच आवडतीचा पदार्थ आहे. दुपारच्या जेवणासाठी स्वस्तात आणि उत्तम असा हा पदार्थ आहे. तुम्ही जर पुण्यात असाल आणि तुम्हाला टेस्टी पुरी भाजी खायची असेल तर स्वातंत्र्यपूर्वीपासून सुरु असलेल्या चेतना डायनिंग हाॅल या हाॅटेलला जरुर भेट द्या. इथे तुम्हाला चवदार अशी पुरी भाजी चाखायला मिळेल.
जुन्या पुण्यातल्या बुधवार पेठेत चेतना डायनिंग हाॅल आहे. गेल्या 93 वर्षांपासून हे हाॅटेल खवय्यांची आवड जपतंय. हाॅटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला अगदीच नव्वदच्या शतकात गेल्याचा फिल येईल. इथला साधेपणा मनात भरताे. दही वाली भाजी पुरी ही इथली स्पेशल डिश आहे. ती का स्पेशल आहे, हे तुम्हाला ती ट्राय केल्यावरच कळेल. बटाट्याची भाजी अन कुरकुरीत पुऱ्या म्हणजे स्वर्गसुखाचा आंनदच.
पुरी भाजीबराेबरच इथल्या साऊथ इंडियन डिशेस सुद्धा फेमस आहे. त्यामुळे त्यासुद्धा ट्राय करायला हरकत नाही. त्याचबराेबर यांचच शेजारी एक स्वीट शाॅपसुद्धा आहे. तिथे तुम्हाला विविध प्रकारच्या जिलेबी आणि पेढे मिळतील. त्यातही इथली अंजीर बर्फी नक्कीच ट्राय करण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही बुधवार पेठ भागात असाल आणि तुम्हाला बजेटमध्ये आणि चवदार असं काही खायचं असेल तर चेतना डायनिंग हाॅलचा उत्तम पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. आणि शेजारीच स्वीट मार्ट असल्याने तुमच्या आवडची स्वीट डिशसुद्धा तुम्हाला ट्राय करता येईलच.