पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:39 PM2019-07-09T14:39:06+5:302019-07-09T14:39:43+5:30

पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा-गरम चहाची गंमत वेगळी असते. त्याचप्रमाणे जांभूळ आणि त्यांना मीठ लावून खाण्याची बात काही औरच... जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Health benefits and different jamun recipes | पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी

पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी

Next

पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा-गरम चहाची गंमत वेगळी असते. त्याचप्रमाणे जांभूळ आणि त्यांना मीठ लावून खाण्याची बात काही औरच... जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच डायबिटीस, कॅन्सरसोबतच वजन कमी करण्यासाठीही जांभूळ उपयोगी ठरतं. असं बहुगुणी जांभूळ नुसतं खाणं आवडत नसेल तर तुम्ही यापासून हटके पदार्थही तयार करू शकता. जाणून घेऊया जांभळापासून तयार करण्यात येणाऱ्या काही हटके रेसिपींबाबत...

जांभळाचा जॅम 

साहित्य : 

  • जांभूळ
  • साखर 
  • लिंबाचा रस 
  • सायट्रिक अ‍ॅसिड 

 

कृती : 

- पॅनमध्ये कापलेले जांभूळ आणि अर्धा कप पाणी एकत्र करून मंद आचेवर शिजवून घ्या. 
- आता मिश्रणामध्ये साखर एकत्र करून पुन्हा मध्यम आचेवर शिजवून घ्या. 
- जेव्हा मिश्रण घट्ट होइल त्यानंतर लिंबाचा रस किंवा सायट्रिक अॅसिड एकत्र करून घ्या. 
- तयार मिश्रण गरम असतानाच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. 
- थंड झाल्यानंतर जांभळाचा टेस्टी आणि हेल्दी जॅम पराठा किंवा ब्रेडला लावून सर्व्ह करा. 

जांभळाची आइस्क्रीम 

साहित्य : 

  • जांभळाचा गर 
  • साखर 
  • व्हेनिला आइस्क्रीम

 

कृती : 

- एका ब्लेंडिग जारमध्ये जांभळाचा गर आणि साखर एकत्र करून घ्या. 
- यामध्ये व्हेनिला आइस्क्रीम एकत्र करून फेटून घ्या. 
- कंटेनरमध्ये एकत्र करून फ्रिजमध्ये 3 ते 4 तासांसाठी सेट करा. 
- सोपी आणि हेल्दी जांभळाची आइस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. 

जांभळाचा हलवा 

साहित्य :

  • जांभूळ
  • तूप 
  • साखर 
  • मावा 
  • ड्रायफ्रुट्स 
  • वेलचीची पूड 

 

कृती : 

- जांभूळ थोडेसे वाटून पेस्ट तयार करा. 
- एक पॅनमध्ये तूप गरम करून जांभळाची पेस्ट 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घ्या. 
- मिश्रणामध्ये साखर एकत्र करा. 
- मावा आणि वेलची पावडर एकत्र करून घट्ट होइपर्यंत एकत्र करा. 
- चविष्ट असा जांभळाचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. 
- ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करा जांभळाचा हलवा.

Web Title: Health benefits and different jamun recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.