दूधाप्रमाणेच cheese आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; कसं ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:43 PM2019-05-13T12:43:16+5:302019-05-13T12:45:27+5:30
आपल्याला अनेकदा फळं आणि भाज्यांच्या फआयद्यांबाबत सांगण्यात येतं. पण तुम्हाला कधी कोणी चीजच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगितले आहे का?
आपल्याला अनेकदा फळं आणि भाज्यांच्या फआयद्यांबाबत सांगण्यात येतं. पण तुम्हाला कधी कोणी चीजच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगितले आहे का? अनेकदा आपल्याला चीज कमी खा, शरीरासाठी हेल्दी नसतं, त्यामध्ये खूप फॅट्स असतात, असे अनेक सल्ले दिले जातात. पण हेच चीज आरोग्यासाठी फायदेशीरही ठरतं. चीज एक असं डेअरी प्रोडक्ट आहे, जे लोकांना फास्ट फूडच्या वाढत्या क्रेझमुळे फार आवडतं. खरं तर कोणत्याही पदार्थाचे प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. याउलट कोणत्याही पदार्थाचा अतिरेक करणं हे शरीरासाठी नुकसानदायीच ठरतं. जाणून घेऊया चीज खाल्याने शरीराला होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
चीजच्या आरोग्यदायी फआयद्यांबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, झिंक यांसारखी अनेक पोष्टिक तत्त्व असतात. यामध्ये व्हिटॅमिन-बी आणि व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात असतं. चीजची एक स्लाइस एक ग्लास दूधासमान असते. त्यामुळे चीजचे योग्य प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीरचं ठरतं.
दातांसाठी उपयोगी
चीज दातांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. हे दातांसाठी एखाद्या सुरक्षा रक्षकाप्रमाणे काम करतं. खनिज तत्व तोंडातील लॅक्टिक अॅसिडच्या मदतीने दातांच्या अनेमलची रक्षा करतात. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस यांसारखी तत्व दातांच्या मजबुतीसाठी आणि बराच वेळ दातांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. यामुळे दात खराब होण्यापासून बचाव करणं सहज शक्य होतं.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी
चीजमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळून येतं. हे मसल्स तयार करण्यासाठी मदत करतात. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्यासाठी कमीत कमी आहार घेऊन दोन ते तीन सर्विंग लो फॅट चीज अगदी सहज खाऊ शकतो. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
चीजमध्ये चांगले मायक्रो बॅक्टेरिया असतात, जे आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. चीज मेटाबॉलिजम प्रक्रिया वाढविण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन-बी 12 बॅक्टेरिया पोटाच्या समस्यांवर परिणामकारक ठरतात. चीज सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर आहेत, जे शरीर निरोगी ठेवून शरीराल ऊर्जा देतं. यामध्ये ओमेगा 3, 6 आणि अमिनो अॅसिड मेंदूसाठी फायदेशीर ठरतं.
हाडांच्या मजबुतीसाठी
चीज हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन-बी कॅल्शिअम संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवतं आणि व्हिटॅमिन-डी कॅल्शिअम हाडांमध्ये स्टोअर करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे हाडं मजबुत होतात. तसेच चीज वयोवृद्ध लोकांमध्ये ऑस्टियोपोरोसिसच धोका कमी करतं. हा क प्रकारचा हाडांचा रोग आहे, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातूम आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.