वजन, वेदना आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर रायबोस चहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 11:28 AM2019-01-18T11:28:08+5:302019-01-18T11:29:48+5:30
तुम्ही चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत ऐकलं असेल. पण तुम्ही रायबोस चहाबाबत ऐकलं का?
चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, चहामध्ये असे काही अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. त्यामुळे चहाचं सेवन एक दृष्टीने लाभदायकही असतं. चहाचा एक फार मोठा इतिहास आहे. चहाचा सध्या सामाजिक आणि समारोहात प्रयोग होऊ लागला आहे. चीन आणि जपानमधून चहाचा इतिहास जगभरात पोहोचला आणि रोज चहाचा वापर होऊ लागला. तुम्ही चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत ऐकलं असेल. पण तुम्ही रायबोस चहाबाबत ऐकलं का?
रायबोस हा चहाचा एक चांगलाच प्रसिद्ध प्रकार आहे. दक्षिण आफ्रिकेत हा चहा चांगलाच प्रसिद्ध आहे. इथेच या चहाचं झाडं लागतं. रायबोस हा चहा सामान्य चहा आणि कॉफीपेक्षा अधिक आरोग्यदायी मानला जातो. कारण यात शरीराचं नुकसान करणारं कॅफीन नसतं. आफ्रिकेत या चहाला लाल चहा म्हणून ओळखलं जातं.
कसं करतात सेवन?
तसा तर हा चहा सामान्य काळ्या चहासारखा सेवन केला जोता. पण या चहाची खासियत म्हणजे या चहामध्ये आधीच गोडवा असल्याने यात वेगळी साखर घालावी लागत नाही. रायबोस चहाची दुसरी खासियत म्हणजे हा चहा रात्री प्यायल्यास चांगली झोप लागते.
रायबोस चहाचे फायदे?
रायबोस चहामध्ये उच्च स्तराचं अॅंटी-ऑक्सिडेंट आढळतं. तसेच यात असणारे काही खास तत्वांमुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी कमी केली जाऊ शकते. रायबोस चहामुळे शरीराला वेदनातून सुटका मिळते. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या कोरियन अभ्यासात असं आढळलं की, रायबोस चहामध्ये आढळणाऱ्या एस्पलाथिनमुळे ब्लड प्रेशर चांगलं होतं.
तसेच दुसऱ्या एका शोधात असं आढळलं की, जर जास्त वजन असलेल्या व्यक्तीला ६ आठवड्यांपर्यंत लाल चहा दिला तर त्यांच्या गुड कोलेस्ट्रॉलमध्ये वाढही होते आणि सोबतच वजनही कमी होतं. तसेच याच्या सेवनाने हृदयरोगांचाही धोका कमी होतो. रायबोस चहा अर्थात लाल चहाच्या सेवनाने कोणत्याही प्रकारच्या ट्यूमरचा विकास रोखला जातो.
रायबोस चहामध्ये आढळणारं एस्पलाथिन तत्वांचा वापर उंदरांवर करण्यात आला. ज्यामुळे इंन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया चांगली होते. एक्सपर्ट्सनुसार, याचा वापर टाइप-२ डायबिटिज रुग्णांच्या उपचारासाठीही केला जाऊ शकतो. पण यावर आणखी अभ्यास करणे सुरु आहे.
रायबोस चहामधील हे इतके गुण पाहून चांगल्या आरोग्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की, जर तुम्ही कोणत्याही औषधांचं सेवन करत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.