कच्चं पनीर खाणं शरीरासाठी फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 05:14 PM2018-07-28T17:14:59+5:302018-07-28T17:15:37+5:30
आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूधापासून तयार होणारं पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असतं.
आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूधापासून तयार होणारं पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असतं. पनीरमध्ये प्रोटीन, फॉस्फरस, न्यूट्रीशिअन्स आणि कॅल्शिअम असल्यानं ते आरोग्यदायी आहे. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असते. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणं पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. त्यामुळे पनीर खाणं आणि त्याचे फायदे जाणून घेणं आवश्यक आहे.
केव्हा खाल पनीर...
कच्च्या पनीरचं सेवन नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या 1 तास अगोदर करावं. तसेच व्यायामानंतर काही वेळानं पनीर खाणंही शरीरासाठी फायदेशीर असतं. याव्यतिरिक्त रात्रीच्या जेवणाआधी पनीर खाल्यानं शरीराला फायदा होतो. कारण रात्रीचं जेवणं पचवण्यासाठी शरिराला प्रोटीनची सर्वात जास्त गरज असते. पनीरमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असते.
1. हाडांच्या मजबूतीसाठी
कच्च्या पनीरमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं. त्यामुळे रोज पनीर खाल्यानं हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते. तसेच याच्या सेवनानं सांधेदुखीवरही आराम मिळतो.
2. चरबी कमी होण्यास उपयुक्त
प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
3. मधुमेहावर नियंत्रण
कच्च्या पनीरमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतं. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांना फार फायदा होतो. रोज पनीर खाल्यानं शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
5. दात मजबूत होतात
पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
6. दात मजबुत होण्यासाठी उपयोगी
पनीरमध्ये प्रथिनं असतात. आपण नेहमी ऐकतो मात्र त्यामध्ये कॅल्शियमही जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात.
7. भुकेवर नियंत्रण राहतं
पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
टीप : पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.