लाल रंगाची फळं आणि भाज्या शरीरासाठी असतात लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:54 PM2018-09-01T13:54:05+5:302018-09-01T14:05:04+5:30

लाल रंगं म्हणजे धोक्याची सुचना असं म्हटलं जातं. परंतु, प्रत्येकवेळी लाल रंग म्हणजे धोक्याचा इशारा हा गैरसमज आहे. कारण लाल रंगाच्या भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

health benefits of eating red colors fruits and vegetables | लाल रंगाची फळं आणि भाज्या शरीरासाठी असतात लाभदायक!

लाल रंगाची फळं आणि भाज्या शरीरासाठी असतात लाभदायक!

googlenewsNext

लाल रंगं म्हणजे धोक्याची सुचना असं म्हटलं जातं. परंतु, प्रत्येकवेळी लाल रंग म्हणजे धोक्याचा इशारा हा गैरसमज आहे. कारण लाल रंगाच्या भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लाल रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये कॅलरी  सोडिअमची मात्रा कमी असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने लाल रांगाच्या भाज्या आणि फळे फायदेशीर असतात. 

आपल्या रोजच्या जेवणात टॉमेटोचा सर्रास वापर करण्यात येतो. तसेच अनेक जण सलाडमध्येही टॉमेटो खाणं पसंत करतात. टॉमेटोमध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. 

स्ट्रॉबेरी म्हटलं की, लहान मुलांपासून मोठ्या माणसांच्या तोंडालाही पाणी सुटतं. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर असते. स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.

क्रेनबेरी यूटीआयपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरते. ही पोटातील बॅक्टेरिया आणि पोटात अल्सर तयार करणाऱ्या एच पायलोरी तत्वापासूनही बचाव करतात. 

चेरीमध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. 

रासबेरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामध्ये झिंक, नियासिन, पोटॅशिअम आणि मोठ्या प्रमाणात पॉलीफेनोलिक फायटोकेमिकल्स असतं. 

लाल शिमला मिरचीमध्ये असलेलं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई, फोलेट यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. 

लाल राजमाही शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात. 

कलिंगडही शरीरासाठी लाभदायक असतं. तसेच एलडीएल कोलोस्ट्रॉल कमी करून स्ट्रोकचाही धोका कमी करतो. कलिंगडामध्ये लायकोपिन अधिक प्रमाणात असतं.

बीट शरीरासाठी फायदेशीर असतं हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. बीटामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते. 

गाजर कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि ड्रायटी फायबर सारख्या पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहे. ही स्रव तत्वं शरीरासाठी लाभदायक असतात.

सफरचंदामध्ये असणारी अॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करतं.

डाळिंबामध्ये असणारे अॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.

Web Title: health benefits of eating red colors fruits and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.