दोन अंजीर रोज खाल्ल्यास होईल चमत्कार, दूर पळतील ६ आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 04:27 PM2019-08-27T16:27:42+5:302019-08-27T16:28:28+5:30

ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात हे आपल्याला माहीत आहे. तसेच ड्रायफुट्सच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. जर तुम्ही आरोग्यासाठी हेल्दी ब्रेकफास्टच्या शोधात असाल तर ड्रायफ्रुट्स तुमची नक्की मदत करतील.

Health benefits of eating soaked anjeer daily | दोन अंजीर रोज खाल्ल्यास होईल चमत्कार, दूर पळतील ६ आजार

दोन अंजीर रोज खाल्ल्यास होईल चमत्कार, दूर पळतील ६ आजार

googlenewsNext

ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात हे आपल्याला माहीत आहे. तसेच ड्रायफुट्सच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. जर तुम्ही आरोग्यासाठी हेल्दी ब्रेकफास्टच्या शोधात असाल तर ड्रायफ्रुट्स तुमची नक्की मदत करतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हेल्दी ड्रायफ्रुटबाबत सांगणार आहोत. ते म्हणजे, अंजीर. आपल्यापैकी कदाचितच कोणाला माहीत असेल की, बदामानंतर सर्वात फायदेशीर असं ड्रायफ्रुट जर कोणतं असेल तर ते अंजीर. शरीराला ऊर्जा देण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, डायबिटिस, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, कॅन्सरवर गुणकारी आणि हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी अंजीर मदत करतं. पण तुम्हाला माहीत आहे का? अंजीर नुसतं खाण्यापेक्षा जर भिजवून खाल्लं तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं. 

एवढचं नाहीतर महिलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंजीर गुणकारी ठरतं. परंतु, यामध्ये निसर्गतः उष्ण तत्व असल्याने महिला ते खाणं टाळतात आणि फक्त हिवाळ्यामध्येच खातात. भिजवून अंजीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊया फायद्यांबाबत... 

भिजवून अंजीर खाण्याचे फायदे : 

1. अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते. 

2. अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.  

3. अंजीरमुळे शक्ती, ऊर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यासही मदत होते.  

4. अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

5. ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस 2 अंजीर खाणं अधिक फायदेशीर आहे.


 
6. अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Web Title: Health benefits of eating soaked anjeer daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.