...म्हणून आहारात कसूरी मेथीचा समावेश करणं ठरतं फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:22 PM2019-01-05T13:22:22+5:302019-01-06T12:35:50+5:30
कसूरी मेथी एक असा पदार्थ आहे ज्याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आयुर्वेदातही कसूरी मेथी खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. आपण अनेकदा जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी कसूरी मेथीचा वापर करतो. पण अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणूनही कसूरी मेथीचा वापर करता येऊ शकतो.
कसूरी मेथी एक असा पदार्थ आहे ज्याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कसूरी मेथी म्हणजे मेथीची सुखवलेली पाने. अनेक जण स्वयंपाकामध्ये मसाल्यांच्या स्वरुपात कसूरी मेथीचा वापर करतात. जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी अनेक कसूरी मेथीचा उपयोग करतात. मेथीची पाने मानवी शरीरासाठी पोषक असल्याचे म्हटले गेले आहे. आयुर्वेदातही कसूरी मेथी खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणूनही कसूरी मेथीचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं. यामुळे शरीराचा अनेक इन्फेक्शनपासून बचाव होतो. याव्यतिरिक्त यामध्ये कार्बोहाइड्रेट्स आणि अॅन्टी-इंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. जे त्वचा आणि केसांशी निगडीत समस्यांसाठी उत्तम उपाय ठरतात. कसूरी मेथीमध्ये असणारी पोषक तत्व शरीराला बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनशी लढण्यासाठी मदत करतं. कसूरी मेथीमध्ये हिलिंग इफेक्ट असतात. जे शरीराला आलेली सूज आणि वेदना दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया कसूरी मेथीचे आरोग्यवर्धक फायदे...
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी
कसूरी मेथी पोटाच्या सर्व समस्यांवर गुणकारी ठरते. बद्धकोष्ट, अॅसिडिटी यांसारख्या समस्यांवर कसूरी मेथीमध्ये असणारं अॅन्टी-इंफ्लेमेट्री आणि व्हिटॅमिन सी यांसारखे गुणधर्म फायदेशीर ठरतात.
एनीमिया
महिलांमध्ये अनेकदा रक्ताची कमतरता आढळून येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये अॅनिमियाची समस्या अनेकदा दिसून येते. कसूरी मेथीचा आहारामध्ये समावेश केल्याने अॅनिमियाची समस्या दूर होते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी
कसूरी मेथी ब्लड लिपिड लेव्हलसाठी प्रभावी ठरते. तसेच एथेरोस्क्लेरोसिस कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. लिपिड फ्लक्चुएशनमुळे पीडित रूग्णांसाठी कसूरी मेथी गुणकारी ठरते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही कसूरी मेथी फायदेशीर ठरते.
डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी
कसूरी मेथीमध्ये हिलिंग इफेक्ट असतात जे ग्लुकोज मेटाबॉलिज्म नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं. हे एक अॅन्टी-डायबिटीक एलिमेंटप्रमाणे काम करतं. टाइप-2 डायबिटीजने ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरतं.
त्वचा सुंदर बनवण्यासाठी
कसूरी मेथीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि आयर्न असंत. जे त्वचेचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठीही परिणामकारक ठरतं. ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठीही मदत होते.
केस मजबुत करण्यासाठी
कसूरी मेथी केसांसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये आयर्न आणि कार्बोहायड्रेट असतात. जे केसांना मुळांपासून मजबुत करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर डोक्याच्या त्वचेला होणारी खाजेची समस्या दूर करण्यासही मदत होते. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठीही कसूरी मेथी उपयोगी ठरते.
मधुमेह नियंत्रणात ठेवते
मेथींच्या पानांमध्ये मधुमेहाचे प्रमाण कमी करणारी तत्वे आहेत. यामुळे चयापचय प्रक्रिया नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह II (मधुमेहाचा प्रकार) होऊ नये यासाठी कसूरी मेथीचे सेवन करणं फायदेशीर ठरते. कसूरी मेथीच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज होमोस्टॅसिसचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.