चांगल्या आरोग्यासाठी गुणांची खाण आहे ज्वारी, जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 10:52 AM2019-06-06T10:52:18+5:302019-06-06T11:03:08+5:30
अनेकांना माहीत नसेल पण ज्वारी चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या औषधीपेक्षा कमी नाही. याचे अनेक फायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. चला जाणून घेऊ ज्वारीचे फायदे.
(Image Credit : The Better India)
ज्वारी हे धान्य जवळपास सर्वांनाच माहीत असेल. देशातील अनेक भागांमध्ये गहू चपात्या आणि बाजरीच्या भाकरीऐवजी ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या जातात. तुम्हीही अधूनमधून ज्वारीच्या भाकरी खात असाल. पण ग्रामीण भागात ज्वारीच्या भाकरी आजही अधिक प्रमाणात खाल्ल्या जातात. ज्वारी जवळपास ३० प्रजाती आहेत. पण यातील एकच प्रजाती अशी आहे जी खाल्ली जाऊ शकते. अनेकांना माहीत नसेल पण ज्वारी चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या औषधीपेक्षा कमी नाही. याचे अनेक फायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. चला जाणून घेऊ ज्वारीचे फायदे.
ग्लूटेन फ्री असते ज्वारी
(Image Credit : Original Indian Table)
ज्वारीची सर्वात खास बाब ही आहे की, ज्वारी ग्लूटेन फ्री असते आणि जे लोक ग्लूटन फ्री पदार्थाच्या नादात गव्हाचे पदार्थ खात नाहीत, ते ज्वारीच्या भाकरी किंवा त्याचे स्प्राउट खाऊ शकतात.
हाडांना मिळते मजबूती
(Image Credit : The Active Times)
ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम असतं. जे शरीरातील कॅल्शिअम अब्जॉर्ब करण्यास मदत करतं. आणि तुम्हाला हे माहीत आहेच की, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम किती गरजेचं आहे. त्यामुळे ज्वारी अधूनमधून का होईना तुम्ही खाऊ शकता.
लठ्ठपणा कमी करण्यास मदत
(Image Credit : Eat This, Not That!)
लठ्ठपणा किंवा वजन वाढणं ही एक मोठी समस्या झाली आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ज्वारीची मदत होऊ शकते. ज्वारीने वजन कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशनही व्यवस्थित होण्यास मदत मिळते. कारण ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबर वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
(Image Credit : Daily Post Nigeria)
ज्वारीला डायबिटीसमध्ये फायदेशीर मानलं गेलं आहे. कारण ज्वारीमध्ये टेनिन नावाचं एक तत्त्व असतं, जे एंजाइम्सच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवतं. ज्यामुळे शरीरातील स्टार्च दूर केलं जातं. त्यासोबतच शरीरात इन्सुलिन आणि ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं.
गुणांची खाण आहे ज्वारी
(Image Credit : myUpchar)
ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न आणि फॅच भरपूर प्रमाणात असतं. हे सर्व तत्त्व एका फिट आणि हेल्दी शरीरासाठी आवश्यक असतात. तसेच ज्वारीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट तत्त्वही असतात, जे शरीरातून फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात.
त्वचेच्या कर्करोगापासून बचाव
(Image Credit : Goop)
सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठीही ज्वारी वरदान ठरते. ज्वारीमुळे त्वचेत मेलनॉमा सेल्सची अधिक निर्मिती होण्यावर नियंत्रण ठेवलं जातं. हे सेल्स त्वचेच्या कर्करोगासाठी जबाबदार मानले जातात.
(टिप : ज्वारीचे अनेक फायदे असले तरी याची काही लोकांना अॅलर्जी असू शकते. त्यामुळे ज्वारीचं अत्याधिक सेवन करणं टाळा. तसेच डाएटमध्ये ज्वारीचा समावेश करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)