कचरा समजून फेकता का मूळ्याची पाने? फायदे वाचाल तर असं कधीच करणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:11 AM2024-11-11T11:11:28+5:302024-11-11T11:13:30+5:30
Radish Leaves Benefits: जास्तीत जास्त लोक मूळ्याची पाने कचरा म्हणून फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मूळ्यांपेक्षा मूळ्याच्या पानांमध्ये जास्त पोषक तत्व असतात.
Radish Leaves Benefits: हिवाळ्याला सुरूवात झाली आहे आणि या दिवसांमध्ये वेगवेगळ्या भाज्या बाजारात मिळतात. ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मूळा हिवाळ्यात मिळणारी अशीच एक हेल्दी भाजी आहे. या दिवसात लोक जेवणासोबत कच्चा मूळा आवडीने खातात. तर बरेच लोक याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. जास्तीत जास्त लोक मूळ्याची पाने कचरा म्हणून फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मूळ्यांपेक्षा मूळ्याच्या पानांमध्ये जास्त पोषक तत्व असतात. यात आयर्न, कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, फॉस्फोरस यांसारखे तत्व असतात. जे शरीराचा अनेक समस्यांपासून बचाव करतात. अशात हे जाणून घेऊ की, डायबिटीसच्या रूग्णांनी मूळ्याच्या पानांचं सेवन कसं करावं.
डायबिटीसमध्ये फायदेशीर मूळ्याची पाने
डायबिटीसच्या रूग्णांसाठी मूळाच्या पानाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं. मूळ्याच्या सेवनाने ब्लड शुगरचं प्रमाण बरंच कंट्रोल केलं जाऊ शकतं. ज्याना डायबिटीस आहे, त्यांनी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फूड्सचं सेवन कमी करावं. कारण हे फूड्स ब्लड शुगर लेव्हलवर उलटा प्रभाव टाकतात. मूळ्यामध्ये अॅंटी-डायबेटिक तत्व असतात, जे इम्यून सिस्टीमला ट्रिगर करतात, ग्लूकोज वाढवतात आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.
कसं कराल मूळ्याच्या पानांचं सेवन?
१) सूप
हिवाळ्यात सूप पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसच्या रूग्णांनी मूळ्याच्या पानांचा सूप तयार करून सेवन करावं.
२) सलाद
मूळ्याच्या पानांचा तुम्ही सलादही बनवू शकता. हे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर कापा आणि एका वाटीमध्ये मिक्स करून सेवन करा.
३) भाजी
मूळ्याच्या पानांची भाजी खूप टेस्टी लागते. जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करायचं असेल, तुम्ही या दिवसांमध्ये मूळ्याच्या पानाच्या भाजीचं सेवन केलं पाहिजे.