मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 11:09 AM2019-07-12T11:09:01+5:302019-07-12T11:15:41+5:30

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तसेच याची शेती करणंही अत्यंत सोपं आहे.

Health benefits of soyabeen decreases the risk of diabetes | मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे

मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे

Next

(Image Credit : Money & Markets)

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तसेच याची शेती करणंही अत्यंत सोपं आहे. सोयाबीनच्या सेवनाने फक्त मेटाबॉलिज्म उत्तम होत नाही तर हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते. कोलेरेक्टल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी सोयाबीन मदत करतं. सोयाबीनमध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं. हे महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. तसचे महिलांना सतावणाऱ्या अनीमिया आणि कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या हाडांच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. 

कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे सोयाबीन 

आयर्न आणि फॉस्फर यांसारखी खनिज तत्वांनी भरपूर सोयाबीन पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पावसाळ्यामध्ये अनेक आजार बळावण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे सध्याच्या अनियमित जीवनशैलीमुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर यांसारखे अनेक आजारांचा धोका वाढतो. उकडलेलं सोयाबीन कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. सोयाबीन पाण्यामध्ये उकडून खाल्याने शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शिअम मिळतं. सोयाबीनमध्ये 52 टक्के प्रोटीन आणि फक्त 19 टक्के फॅट्स असतात. 

सोयाबीन खाण्याचे फायदे : 

- दिवसातून एकदातरी सोयाबीनच्या पीठाने तयार केलेली चपाती खाल्याने पोट स्वच्छ होण्यास मदत होते आणि अ‍ॅसिडीटी दूर होण्यासाठी मदत होते. 

- सोयाबीन वाढत्या वयाच्या मुलांसाठी, वृद्ध माणसांसाठी, डायबिटीसच्या रूग्णांसाठी, हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्यांसाठी आणि लठ्ठपणाच्या समस्येने हैराण झालेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरतो. 

- अशक्तपणा जाणवत असेल तर मोड आलेल्या सोयाबीनचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही मोड आलेल्या सोयाबीन्सचा आहारातही समावेश करू शकता. 

- सोयाबीन शरीराच्या विकासासाठी आवश्यक असणारे प्रोटीन आणि नैसर्गिक खनिज पदार्थांच्या पूर्ततेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

- डायबिटीसच्या रूग्णांसाठी सोयाबीन एखादं वरदानचं आहे. त्यासाठी आहारामध्ये सोयाबीनच्या पिठाचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. 

- ज्या महिला आपल्या नवजात बालकांना ब्रेस्ट फिडिंग करत असतील त्यांनी आवर्जुन सोयाबीनचा आहारात समावेश करणं अत्यंत आवश्यक ठरतं. 

- सोयाबीनच्या पिठापासून तयार करण्यात आलेला हलवा दररोज खाल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

- अमेरिकेतील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, सोयाबीनमध्ये अस्तित्वात असणारे फायबर कोलोरेक्टल आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. 

- सोयाबीन हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक ठरतं. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि कॉपर यांसारखी पोषक तत्व असतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतात. 

- सोयाबीन बर्थ डिफेक्ट म्हणजेच, जन्मापासून असलेल्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फॉलिक अॅसिड गरोदर महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर पोटात वाढणाऱ्या बाळाच्या मानसिक विकासासाठीही सोयाबीन अत्यंत फायदेशीर ठरतं. 

- जर आपणास काही मानसीक अजार असेल तर आपल्या अहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा. सोयाबीन मानसीक संतूलनावर प्रचंड प्रभावी असते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायेदशीर ठरतं. 

Web Title: Health benefits of soyabeen decreases the risk of diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.