आरोग्यासाठी घातक ठरतात 'हे' मशरूम; खरेदी करताना अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 12:36 PM2019-06-01T12:36:04+5:302019-06-01T12:41:04+5:30

मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते.

Health tips things to remember while purchasing mushrooms | आरोग्यासाठी घातक ठरतात 'हे' मशरूम; खरेदी करताना अशी घ्या काळजी

आरोग्यासाठी घातक ठरतात 'हे' मशरूम; खरेदी करताना अशी घ्या काळजी

googlenewsNext

मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. तसेच मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटही असून यामुळे शरीरातील वाढत्या वयाच्या लक्षणं दिसत नाहीत. याव्यतिरिक्त मशरूममध्ये कोलीन नावाचं एक खास पोषक तत्त्व आढळतं. जे स्नायूंची सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

बाजारामध्ये मशरूमच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. ज्यांचा आहारात समावेश केल्याने तुम्ही आजारी पडू शकता. जर मशरूमवर काळे दाग किंवा काळ्या पावडरप्रमाणे काह दिसलं तर, असं मशरूम खरेदी करणं टाळा. अशा मशरूमचं सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. 
जाणून घेऊया मशरून हेल्दी आहेत की नाहीत ते कसं ठरवावं त्याबाबत...

साधारणतः आपण सर्वचजण जाणतो की, मशरूम आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. खरं तर मशरूममध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. त्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळण्यास मदत होते. 

काही गोष्टी माहितीसाठी जाणून घेणं आवश्यक आहे. बाजारातून मशरून खरेदी करताना जर तुम्ही योग्य योग्य मशरूम निवडू शकला नाहीत, तर तुम्ही स्वतः तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. आरोग्यासाठी हानिकारक असतात पिवळे-काळे मशरूम, खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या....

खराब मशरूम असे ओळखा : 

  • भाजी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशरूमला बटन मशरूम असं म्हटलं जातं. या मशरूमचा वरील भाग पांढरा आणि गोल असतो. बाजारात कोणत्याही चांगल्या दुकानात जाऊन ताजे बटन मशरूम खरेदी करू शकता. 
  • थंड ठिकाणांवर किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी कुकुरमुत्ता उगवतं. हे दिसायला मशरूमप्रमाणेच असतात. पण यावरील छत्री पसरट असते. यांना जंगली मशरूम असंही म्हटलं जातं. हे मशरून खरेदी करू नका. कारण हे आरोग्यासाठी घातक ठरतात. 
  • जर मशरूनवर काळे डाग किंवा काळी पावडरसारखं काही दिसलं तर मशरूम खरेदी करू नका. 
  • जर मशरूमच्या छत्रीवर छोटे-छोटे डाग किंवा फंगस दिसत असेल तर ही मशरूम खराब होण्याची चिन्ह आहेत. 
  • मशरूम खरेदी करताना जर ते ताजे नसतील किंवा दुर्गंधी येत असेल तर असे मशरूम खरेदी करणं टाळा. 
  • जर मशरून सुकलेले असतील तर अजिबातच खरेदी करू नका. 

 

...म्हणून मशरूम होतात खराब 

खरं तर मशरूम बाहेरच्या देशांमधून आयात केले जातात. त्यानंतर व्यापाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांच्याकडे मशरूम व्यवस्थित स्टोअर करण्यासाठी योग्य ते साहित्य नसतं. ज्यामुळे मशरूम 24 तासांनंतर काळे दिसू लागतात किंवा त्यावर फंगस दिसू लागतं. परंतु व्यापारी यावरील फंगस काढून टाकून ते ग्राहकांना विकतात. याव्यतिरिक्त बाजारांमध्ये सुटे मिळणारे मशरूमही शिळे असतात. असे मशरूम खाल्याने आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

Web Title: Health tips things to remember while purchasing mushrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.