Gul Poli Recipe : नाश्त्यासाठी हेल्दी ठरते गुळपोळी; सांधेदुखीसोबतच पचनक्रिया सुधारण्यासही फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 11:40 AM2019-08-27T11:40:00+5:302019-08-27T11:44:01+5:30
पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते.
पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार, गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही. तुम्ही ही पोळी तयार करताना तूप लावू शकता. जाणून घेऊया गुळपोळी तयार करण्याची पद्धत...
गुळपोशी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- गव्हाचं पीठ
- गुळ
- पाणी
- खसखस
- तूप ड्रायफ्रुट्स
- बडिशोप
गुळपोळी तयार करण्याची पद्धत...
- सर्वात आधी कोमट पाण्यामध्ये गुळ भिजवून ठेवा. जवळपास अर्ध्या तासातच हा गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून जाईल.
- आता बाउलमध्ये गव्हाचं पीठ आणि थोडं तूप एकत्र करून घ्या. तयार मिश्रण गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- तयार पीठाचे गोळे घेऊन हलक्या हाताने लाटून घ्या. लक्षात ठेवा की, गुळपोळी थोडी जाडसरच लाटावी. तसेच लाटताना त्यावर थोडी खसखस वरून टाका.
- तयार पोळी तव्यावर व्यवस्थित भाजून घ्या. एका बाजून भाज्याल्यानंतर पोळी पलटा आणि तूप लावून दोन्ही बाजूने भाजा.
- गोड गुळाची पोळी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही गरम-गरम सर्व्ह करू शकता.
खास गोष्ट म्हणजे, ही पोळी तुम्ही कधीही खाऊ शकता. याची चव आणि पोष्टिकतेमध्ये काहीही फरक नाही.
गुळपोळीचे आरोग्याला होणारे फायदे :
आयर्नचा उत्तम स्त्रोत...
गुळापासून तयार करण्यात आलेली गुळाची पोळी आरोग्यासाठी उत्तम ठरते. गुळामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे गुळपोळी खाल्याने आयर्नची कमतरता भासत नाही.
सांधेदुखीवर गुणकारी
जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सांधेदुखीचा त्रास होत असेल तर नाश्त्यामध्ये गुळाची पोळी आणि दूध खा. यातील पोष्टिक तत्व हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
सर्दी-खोकल्यावर लाभदायक...
पावसाळ्यामध्ये वाढणारं इन्फेक्शन आणि वायरल फ्लूमध्ये गुळाची पोळी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे इम्युनिटी बूस्ट करण्यास मदत होते. तसेच गुळामध्ये निसर्गतःच उष्ण तत्व असल्यामुळे सर्दी-खोकल्यावर गुळ अत्यंत फायदेशीर ठरतो.
पचनक्रियेसाठी गुणकारी
गुळपोळी आयर्न आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहेत. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. तसेच हे पचण्यास अत्यंत हलकं असतं. याच्या सेवनाने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते. ज्यामुळे तुम्ही ओवरइटिंग किंवा फूड क्रेविंगपासून दूर राहू शकता.
ऊर्जा वाढविण्यासाठी
गुळपोळी एनर्जीचा उत्तम स्त्रोत आहे. याच्या सेवनाने आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर आहारामध्ये गुळपोळीचा समावेश करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.