पावसाळ्यात एन्जॉय करा खास मक्याचे कबाब; एकदा खाल तर खातच रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:41 PM2019-07-10T12:41:22+5:302019-07-10T12:46:07+5:30
पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा.... म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते.
पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा.... म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण या वातावरणामध्ये बॅक्टेरियांची भितीही फार असते. त्यामुळे स्ट्रिट फूडपासून दूर राहण्याचा सल्ला अनेकदा आपल्याला देण्यात येतो. पण अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. जी तुमची चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.
पावसाळा आणि भुट्टा म्हणजे न जुळणारं समीकरणं.... बॅक्टेरियांच्या भितीमुळे बाजारात मिळणारा भुट्टा खाण्याची भिती वाटते. अशातच इच्छा असूनही भुट्टा खाणं टाळलं जातं. पण तुम्ही घरीच यापासून एखादा चमचमीत पदार्थ तयार करून खाऊ शकता. तुम्ही घरच्या घरी भुट्ट्याचे म्हणजेच मक्याचे कबाब तयार करू शकता. हा पदार्थ हेल्दी असण्यासोबतच टेस्टीही ठरतो. जाणून घेऊया घरीच मक्याचे कबाब तयार करण्याची रेसिपी...
मक्याचे कबाब तयार करण्यासाठी साहित्य :
- बटाटे
- तेल
- मका
- जायफळाची पावडर
- धने
- दालचिनी पावडर
- बारिक चिरलेल्या मिरच्या
- हिरवी मिरची
- आलं-लसणाची पेस्ट
- गरम मसाला पावडर
- मीठ
- बटर
- आमचूर पावडर
- मक्याचे पिठ
हेल्दी मक्याचे कबाब तयार करण्याची कृती :
- बटाटा आणि मका उकडून स्मॅश करा
- सर्व साहित्य एकत्र करून आणि त्याचे छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्या.
- प्रत्येक गोळ्यामध्ये एक टूथपिक लावा आणि तेलामध्ये डिप फ्राय करा.
- मक्याचे हेल्दी आणि टेस्टी कबाब खाण्यासाठी तयार आहेत.
- तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
- तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्सही स्टफ करू शकता.