थंडीमध्ये हेल्दी राहायचंय?; मग 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 03:38 PM2019-10-28T15:38:37+5:302019-10-28T15:45:27+5:30

हिवाळ्यात अनेक सीझनल फळं आणि भाज्या उपलब्ध होतात. ज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर होत्या. वातावरणानुसार, ज्या व्यक्ती हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं सेवन करतात.

Healthy fruits and vegetables of winter must eat to be healthy | थंडीमध्ये हेल्दी राहायचंय?; मग 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

थंडीमध्ये हेल्दी राहायचंय?; मग 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

Next

हिवाळ्यात अनेक सीझनल फळं आणि भाज्या उपलब्ध होतात. ज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर होत्या. वातावरणानुसार, ज्या व्यक्ती हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं सेवन करतात. त्या दीर्घायुषी होतात. जर तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर थंडीत खाली दिलेल्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात नक्की समावेश करा. यांमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. जी थंडीत शरीराचं रक्षण करण्यासाठी मदत करतात. थंडीत शरीराची चयापचय क्रिया मंदावते. अशातच ती फळं आणि भाज्यांचं सेवन नक्की करा. ज्यांमध्ये भरपूर न्यूट्रीशन्स असतात. जाणून घ्या कोणत्या भाज्या आणि फळांचं आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत... 

गाजर 

हिवाळ्यात बाजारात गाजरांची अवाक् वाढते. तसेच सीझनल फळं आणि भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. गाजरामध्ये सर्वात जास्त कॅरोटीन असतं. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, डी, बी, ई आणि के हेदेखील मुबलक प्रमाणात असतं. डोळे आणि त्वचेसाठी हे अत्यंत फायदेशीर असतं. थंडीमध्ये त्वचेच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला याचं सेवन करणं आवश्यक असतं. 

संत्री 

संत्र्यामध्ये व्हिटॅंमिन सी अधिक असतं. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. याच्या सेवनाने शरीराला मिनरल्स, पोटॅशिअम, फोलेट आणि फायबर मिळतं. कॅलरीचे प्रमाण कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

मुळा 

थंडीत मुळाही बाजारात सहज मिळतो. यामध्ये फायटोकेमिकल्स असतात जी कॅन्सरचा धोका कमी करतात. व्हिटॅमिन सी अॅन्टीऑक्सिडंटप्रमाणे काम करतात. मुळ्यामध्ये अॅन्टी हायपरटेन्शन गुमधर्म असतात. जे हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी करतात. ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त असाल तर मुळ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामध्ये पोटॅशिअम, फोलिक अॅसिड आणि एस्कॉर्बिक अॅसिड असतं. यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांपासून बचाव राहतो. थंडीमध्ये अनेकदा लोकांना सर्दी आणि खोकला होतो. यापासून बचाव करण्यासाठी मुळा नक्की खा. यामध्ये अॅन्टी-कन्जेस्टिव गुमधर्म असतात. जे कफ, घशात होणारी खवखव, सर्दी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

पालक

पालक ही आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी मानली जाते. एक कप पालकमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न,  मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए असतात. यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही कंट्रोलमध्ये राहतो. रक्तदाबाचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यास पोटॅशिअम महत्त्वाची भूमिका बजावतं.फायबर असलेल्या पदार्थांमुळे पचनक्रिया चांगली होते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि यामुळेच आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दिवसातून एक कप पालक तुमची पचनक्रिया मजबूत करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात पालक भाजीचा समावेश करून तुम्ही वजन करण्यासोबतच आरोग्यही चांगली ठेवू शकता.

पेरु

पेरुमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतता. थंडीमध्ये तुम्ही जेवढे परु खाल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पेरुमधील पोषक तत्व त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही मदत करतात. 

केळी 

थंडीमध्ये केळी खाल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. यामध्ये पोटॅशिअम, फायबर, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतं. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. केळ्यामध्ये पाणीही मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाती शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Healthy fruits and vegetables of winter must eat to be healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.