थंडीत घ्या गाजर आणि टोमॅटोच्या हेल्दी सूपची मजा, कसं कराल तयार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:52 PM2018-12-13T12:52:32+5:302018-12-13T12:53:07+5:30
जर तुम्हालाही थंडीच्या दिवसात गरमागरम सूप पिण्याची आवड असेल तर तुम्ही एकदा गाजर आणि टोमॅटोचा सूप एकदा नक्की ट्राय करावा.
हिवाळ्यात बाजारात गाजरांची चांगलीच आवक वाढते आणि लोकही गाजरांचे वेगवेगळे पदार्थ बनवून चवीने खातात. याने अनेक फायदेही आहेत. तसेच टोमॅटोही चवीसोबतच आरोग्यसाठीही फायदेशीर आहे. अशात या थंडीच्या दिवसात जर गरमागरम सूप मिळालं जर वेगळीच मजा येईल ना? जर तुम्हालाही थंडीच्या दिवसात गरमागरम सूप पिण्याची आवड असेल तर तुम्ही एकदा गाजर आणि टोमॅटोचा सूप एकदा नक्की ट्राय करावा.
हे दोन्ही फळं फारच हेल्दी आहेत आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र करुन यांचं सूप तयार केलं तर यातून दुप्पट पोषक तत्व आपल्याला मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे हे सूप तुम्ही थंडी आणि गरमीच्या दोन्ही वातावरणात सेवन करु शकता. गाजर आणि टोमॅटो दोन्हींमध्ये व्हिटॅमिन ए असतं. त्यामुळे या दोन्हींचं मिश्रण करुन तयार केलेलं हे सूप चांगलंच फायदेशीर ठरु शकतं.
महत्त्वाची बाब म्हणजे हे सूप तयार करण्यासाठी तुम्हाला फार जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. सूपची टेस्ट वाढवण्यासाठी यात तुम्ही काळे मिरे आणि थोडी साखर टाकू शकता. तसेच क्रीमसह हे सेवन केलं जाऊ शकतं. हे तुम्ही दुपारच्या जेवणाआधी सेवन करु शकता किंवा रात्री जेवणाआधी सेवन करु शकता.
हे सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य?
1/2 किलो टोमॅटो
200 ग्रॅम गाजर
चवीनुसार मीठ
1/4 छोटा चमचा काळे मिरे
1 चमचा साखर
बारीक किसलेले गाजर
कसे कराल तयार?
- टोमॅटो आणि गाजर धुवून कापा. एक कप पाण्यात मीठ टाका आणि त्यात गाजर-टोमॅटो उकळून घ्या.
- जेव्हा गाजर आणि टोमॅटो चांगल्याप्रकारे उकळू द्या.
- नंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर हे ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा आणि चाळणीने गाळून घ्या.
- हे पातळ करण्यासाठी याक अर्धा कप पाणी टाका. हे सुद्धा कमी आचेवर उकळू द्या.
- आता यात साखर आणि काळे मिरे टाका. आता हे १० मिनिटांसाठी उकळू द्या.
- आता एका वाटीमध्ये हे सूप काढून त्यावर थोडं क्रिम टाका आणि सूपचा आनंद घ्या.