Holi 2019 : होळीसाठी स्वतः तयार हटके पदार्थ; जाणून घ्या रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:02 PM2019-03-20T13:02:34+5:302019-03-20T13:04:01+5:30
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच होळीसाठी घराघरांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. बऱ्याचदा पुरण पोळीची तयारी घराघरांमध्ये केली जाते.
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच होळीसाठी घराघरांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. बऱ्याचदा पुरण पोळीची तयारी घराघरांमध्ये केली जाते. परंतु संपूर्ण भारतामध्ये होळीच्या निमित्ताने अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. एवढचं नाही तर काही खास पेयही होळीच्या निमित्ताने तयार करण्यात येतात. यातील काही पदार्थ हे पारंपारिक असतात. जसं गुझिया, मालपोहे, शक्करपारा आणि नमकीनपारा इत्यादी. हे असे पदार्थ आहेत, जे होळीच्या निमित्ताने करण्यात येतात. यामध्ये थंडाईसोबतच काही सरबतही तयार करण्यात येतात. थंडाई दोन प्रकारची असते एक भांग असलेली आणि दुसरी भांग नसलेली.
चवीसोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेले पदार्थ आहेत. हे पदार्थ अगदी सहज घरीही तयार केले जाऊ शकतात. थंडाई ड्रायफ्रुट्स आणि दूधाचे मिश्रण असतं. ज्यामध्ये केशर आणि इतर फ्लेवर्स असलेल्या पदार्थांचा उपयोग होतो. थंडाई पिण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात. जे शरीरातील अनेक कमतरता दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच गुझिया आणि मालपोह्यांमध्ये खवा आणि ड्रायफ्रुट्स असतात. जाणून घेऊया होळीसाठी तयार करण्यात येणारे हे पदार्थ कसे तयार करतात?
होळीसाठी स्वतः तयार करा गोडाचे पदार्थ :
थंडाई
थंडाई तयार करण्यासाठी एक लीटर दूध, बदाम, पिस्ता, काजू एकत्र करा. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बडिशोप, तीन मोठे चमचे काळी मिरी, एक वाटी खसखस, 20 ग्रॅम वेलची, दोन चमचे गुलाब पाणी, केशर एकत्र करून भिजत ठेवा. त्यानंतर वाटून घ्या. एका वाटिमध्ये साखरेसोबत दूध एकत्र करा. थंडाई तयार आहे.
रंगीत सरबत
60 ग्रॅम खसखस, 60 ग्रॅम बदाम, साखर एक किलो, पाणी अर्धा लीटर, 5 ग्रॅम सायट्रिक अॅसिड, छोटी वेलची 10 ग्रॅम,काळी मिरी 10 ग्रॅम, टरबूजाच्या बीया 25 ग्रॅम, गुलाबपाणी 100 मिली. 2 ग्रॅम पोटॅशिअम मेटाबाई सल्फेट, केवड्याचं पाणी 25 एमेल, गुलाबाची पानं 20 ग्रॅम. बदाम आणि टरबूजाच्या बिया वेगवेगळ्या भांड्यांमध्ये रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी बदामाची साल काढून बारिक वाटून घ्या. त्यानंतर सर्व मसाले, टरबूजाच्या बिया, गुलाबाची पानं एकत्र वाटून घ्या. साखरेचा पाक तयार करून सायट्रिक अॅसिड, पिस्त बदाम आणि मसाल्यांचं मिश्रण एकत्र करा. 10 ते 15 मिनिटांसाठी उकळत ठेवा. थंड झाल्यानंतर गाळून सरबत म्हणून प्या.
गुझिया
मैदा 250 ग्रॅम, तूप 125 ग्रॅम एकत्र करून मळून घ्या. सारणासाठी 250 ग्रॅम खवा, किसलेला नारळ. ड्रायफ्रुट्स आणि जवळपास 200 ग्रॅम साखर एकत्र करून सारण तयार करा. आता तयार पिठाचे छोटे गोळे तयार करून त्यामध्ये सारण भरून घ्या आणि आवडीचा आकार द्या. डिप फ्राय किंवा बेक करून तुम्ही खाऊ शकता.
मालपोहे
मालपोहे तयार करण्यासाठी मैद्यामध्ये ड्रायफ्रुट्स, बडिशोप आणि साखर एकत्र करून पकोड्यांचा पिठ तयार करून घ्या. तळताना त्यामध्ये चिमूटभर सोडा एकत्र करा. हे डिप फ्राय करा. त्यानंतर रबडीसोबत सर्व्ह करू शकता.
शंकरपाळी
मैद्यामध्ये मोहन एकत्र करून पिठ मळून घ्या. चपातीप्रमाणे थोडंसं जाडसर लाटून तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कापून घ्या. त्यानंतर यांना डिप फ्राय करा, त्यानंतर एकतारी पाक तयार करून त्यामध्ये तयार शंकरपाळ्या सोडा.