Holi 2019 : होळीला घरीच तयार करा थंडाई; जाणून घ्या रेसिपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:08 PM2019-03-19T15:08:37+5:302019-03-19T15:09:18+5:30
होळी म्हणजे उत्साहाचा आणि रंगांची उधळण करणारा सण... होळीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या असून रंग, पिचकाऱ्या यांची खरेदी करण्यात प्रत्येक जण दंग आहे. पण रंगांसोबतच खरी होळीची मजा असते ती म्हणजे, ठंडाई पिण्यामध्ये.
होळी म्हणजे उत्साहाचा आणि रंगांची उधळण करणारा सण... होळीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या असून रंग, पिचकाऱ्या यांची खरेदी करण्यात प्रत्येक जण दंग आहे. पण रंगांसोबतच खरी होळीची मजा असते ती म्हणजे, ठंडाई पिण्यामध्ये. होळीच्या दिवशी रंग खेळण्यासोबतच थंडाई मिळाली की वाह... त्याहून दुसरं सुख ते कसलं? हिच थंडाई आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असते.
थंडाई तयार करणं अत्यंत सोपं असून ही रेसिपी अत्यंत झटपट तयार होणारी आहे. थंडाईमध्ये वापरण्यात येणारे पदार्थ म्हणजेच, बदाम, बडिशोप, गुलाबाची पानं आणि खसखस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. फ्रेशनेससोबतच एनर्जी मिळण्यासाठीही मदत करतं. जर शुगर लेव्हल ठिक असेल तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते थंडाई.
साहित्य :
- साखर - 5 कप
- पाणी - 2 1/2 कप
- बदाम - 1/2 कप
- बडिशोप - 1/2 कप
- काळी मिरी - 2 छोटे चमचे
- खसखस - 2 छोटे चमचे
- छोटी वेलची - 30 ते 35
- गुलाब पाणी - 2 टेबलस्पून
कृती :
- एखाद्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
- एक उकळी आल्यानंतर 5 ते 6 मिनिटांपर्यंत उकळत ठेवा. त्यानंतर गॅस बंद करून ठंड होण्यासाठी ठेवा.
- बडिशोप, काळी मिरी, बदाम, वेलचीचे दाणे आणि खसखस साफ करा आणि धुवून पाण्यामध्ये 2 तासांसाठी भिजत ठेवा.
- त्यानंतर बदामाची सालीसोबतच मिश्रणाती एक्स्ट्रा पाणी बारिक पेस्ट तयार करा.
- पेस्ट तयार करताना पाण्याऐवजी साखरेच्या पाण्याचा वापर करा.
- त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स एकत्र करू शकता.
- थंडगार थंडाई तयार आहे. हे मिश्रण एयरटाइट बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
- जेव्हाही थंडाई पिण्याची इच्छा होईल, त्यावेळी हे मिश्रण दूध आणि बर्फासोबत एकत्र करा.
- आस्वाद घ्या थंडगार थंडाईचा.