Holi special : थंडाई, पुरणपोळी, गुजीया; होळीला 'हे' खास पदार्थ कराल तर घरातले म्हणतील वाह बढीया!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 02:11 PM2020-03-08T14:11:44+5:302020-03-08T14:13:16+5:30
झटपट तयार होणारे पदार्थ खाऊन घरातले नक्की तुमच्यावर खूश होतील.
(image credit- railyatriblog)
होळीचा सण उद्या आहे. होळी आणि पुरणपोळीचं कॉंम्बिनेशन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अनेकांच्या घरी खास वेगवेगळ्या पध्दतीच्या पुरणपोळ्या तयार केल्या जाणार आज आम्ही तुम्हाला पुरणपोळी व्यतिरिक्त झटपट तुम्ही कोणते पदार्थ तयार करू शकता याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ तुम्ही तयार कराल तर घरातले नक्की खूश होतील.
गुजिया- होळीच्या खास दिवशी गुजिया नाहीत तर काहीच नाही. मावा, खवा, ड्रायफ्रुट्सपासून तयार केलेल्या गुजिया पाहून तोडांला पाणी येतं.
दही वडा- दही वड्यासारखं क्लासी स्नॅक्स तुम्ही घरीच तयार करून पाहुण्यांना आणि मित्रांना खाऊ घालू शकता. दही वडा तयार करायला फारसा वेळ सुद्दा लागणार नाही.
पुरणपोळी- होळीचा सण पुरण पोळीशिवाय अपूर्णच. होळीच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी खास पुरण पोळी तयार करण्यात येते.
थंडाई- होळीच्या या रंगीबेरंगी सणाची खरी ओळख म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई नाही प्यायला नाही तर काय प्यायलंत.