लई भारी, घरच्या घरी बनवा मावा केक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 03:41 PM2020-01-27T15:41:06+5:302020-01-27T15:43:28+5:30
केक करण्यासाठी खूप साहित्य किंवा ओव्हन लागतेच असे नाही. अगदी कमी साहित्यात आणि न बिघडण्याच्या भीतीने मावा केक बनवणे शक्य आहे. वाचा ही पाककृती.
पुणे :केक करण्यासाठी खूप साहित्य किंवा ओव्हन लागतेच असे नाही. अगदी कमी साहित्यात आणि न बिघडण्याच्या भीतीने मावा केक बनवणे शक्य आहे. वाचा ही पाककृती.
साहित्य :
दोन वाट्या मैदा,
एक चमचा बेकिंग पावडर,
अर्धा चमचा बेकिंग सोडा
एक वाटी पीठी साखर
अर्धी वाटी लोणी
वेलची पावडर,
जायफळ पूड,
सुका मेव्याचे काप,
टुटीफ्रुटी,
रोज/व्हँनिला ईसेन्स
दूध
कृती :
- दोन वाट्या मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्यावे,
- पाऊण वाटी पीठी साखर व अर्धी वाटी लोणी चांगलं फेटून घ्यावे (फूलून जवळपास डबल होईपर्यंत) नंतर यात वेलची पावडर, जायफळ पूड, सुका मेव्याचे काप, टुटीफ्रुटी, रोज/व्हँनिला ईसेन्स व चाळलेला मैदा एकत्र करावा व फेटून घ्यावे
- हे मिश्रण थोडं घट्टसरच ठेवावं त्यानुसार थोडं दूध घालून फेटून घ्यावे .
- कुकरची शिट्टी व रिंग काढून त्यात अर्धी वाटी मीठ पसरवून व एखादी वाटी त्यात पालथी ठेऊन आधी झाकण लावून गरम करून घ्यावा
- केकचं तयार मिश्रण ग्रीस केलेल्या व मैदा भुरभुरवलेल्या भांड्यात घालून आवडीनुसार वरून सुकामेव्याचे काप टाकून हे भांडे गरम कुकर मध्ये ठेवावे
- कुकरचे झाकण लावून ४५/५० मिनीटे मध्यम आचेवर बेक करायला ठेवावे
- थंड झाल्यावर आवडीनुसार कापून चहासोबत सर्व्ह .मावा केक